महावितरण: वेबिनारद्वारे उच्चदाब ग्राहकांसोबत सुसंवाद

file photo
file photo

नांदेड : कोवीड-19 च्या पार्श्वभुमीवर उच्चदाब वीज ग्राहकांना वीज पुरवठया संबंधी काही समस्या उद्भवत आहेत का त्याचबरोबर तक्रारींचे निवारण व सूचना जाणून घेण्याकरीता महावितरणच्या नांदेड परिमंडळाच्या वतीने वेबीनारद्वारे उच्चदाब वीजग्राहकांसोबत सुसंवाद साधण्यात आला.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी निर्देशित केल्याप्रमाणे नांदेड परिमंडळातील नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील उच्चदाब वीज ग्राहकांसोबत वेबिनारच्या माध्यमातून परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी नुकताच सुसंवाद साधला. योग्य दाबाचा व अखंडित वीज पुरवठ्यासाठी केलेल्या व केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती यावेळी श्री पडळकर यांनी दिली.

वीज वाहिन्यांची देखभाल दुरुस्ती आदी कामे अंतिम टप्प्यात

त्याचबरोबर नवीन वीज जोडणी संदर्भातील ऑनलाइन पद्धतीचा वापर करण्याच्या सूचनाही केल्या. मान्सूनपूर्व कामाद्वारे उच्च दाब वीजवाहिनीला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या कट करणे, औद्योगिक वीज वाहिन्यांची देखभाल दुरुस्ती आदी कामे अंतिम टप्प्यात असून उच्च दाब वीजग्राहकांना योग्य दाबाचा व अखंडीत वीजपुरवठा मिळेल असा विश्वास उच्चदाब ग्राहकांना देण्यात आला.
 
उच्चदाब ग्राहकांनी समाधान व्यक्त केले

याप्रसंगी उच्चदाब ग्राहकांनी केलेल्या मौलिक सूचनांचे स्वागत करत सर्व अडचणी तत्परतेने सोडवल्या जातील याची ग्वाही ही देण्यात आली. कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर औद्योगिक ग्राहकांना अखंडित वीज देऊन डिमांड चार्जेस व विलंब आकारात तात्पुरती सवलत दिल्याबद्दल व कोरोनाच्या काळातही आमच्या समस्या जाणून घेत त्याचे निराकरण केल्याबद्दल वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या उच्चदाब ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती

या वेबिनारद्वारे मध्ये मुख्य अभियंता श्री पडळकर यांच्यासह परभणीचे अधीक्षक अभियंता प्रवीण अन्नछत्रे, हिंगोलीचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव तसेच कार्यकारी अभियंता श्री वनमोरे, श्री रसाळ, श्री जमदाडे त्याचबरोबर चाचणी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री पेंडकर, एस. एस. चौधरी व उपकार्यकारी अभियंता पी. आर. बोडके सर्व उपविभागीय अभियंते यांच्यासह प्रामुख्याने श्री सोनगिरे, श्री डागा, समर्थ ॲग्रो सेलूचे श्री राठी, नंदकिशोर बाहेती, मारुती जिनिंग पुर्णाचे श्री शहाणे यांच्यासह ३९ उच्चदाब वीज ग्राहक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com