वेबीनारव्दारे महावितरणने केले वीज ग्राहकांचे समाधान: दत्तात्रय पडळकर

file photo
file photo

नांदेड : लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांनी केलेल्या वीजवापराचे प्रत्यक्ष रिडींग घेतल्यानंतर संगणीकृत बिलिंग प्रणालीद्वारे एप्रिल, मे महिन्यासह जूनचे देण्यात आलेल्या तीन महिन्यांच्या एकत्रित वीजबिलाबाबत निर्माण झालेला संभ्रम व शंकांचे निवारण करण्याच्या हेतूने नांदेड परिमंडळाच्या वतीने परिमंडळ तसेच उपविभागीय स्तरावर आयोजीत केलेल्या वेबीनारला चांगला प्रतिसाद मिळाला असून ८९८ ग्राहकांनी सहभागी होत आपल्या शंकाचे निवारण करून वाढीव वीजबीला बाबत निर्माण झालेला संभ्रम दूर झाल्याने समाधान व्यक्त केले.

ता. चार जुलै रोजी सकाळी ११ वाजता महावितरण परिमंडळ कार्यालय, नांदेड यांनी माहे जुन महिन्यामध्ये आलेल्या वीज बिला बाबत ग्राहकांमध्ये असलेले संभ्रम दुर करण्यासाठी व संवाद साधण्यासाठी वीज ग्राहकासोबत वेबीनार आयोजित केला होता. यामध्ये नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर व १०२ वीज ग्राहकांनी सहभाग घेतला. श्री पडळकर यांनी वीज ग्राहकांना सांगितले की, माहे एप्रिल व मे या दोन महिन्यामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे मीटरचे वाचन झाले नाही. त्यामुळे ग्राहकांना सरासरी वीजबील आकारण्यात आले होते. 

तीन महिन्याचे सरासरी वीजबिल देण्यात आले

माहे जुनमध्ये प्रत्यक्ष मीटर वाचन करुन मागिल दोन महिन्यात दिलेले सरासरी वीजबिल वजा करुन ग्राहकांना वीजबील देण्यात आले. एप्रिल व मे हे उन्हाळयाचे दिवस होते व या कालावधीमध्ये लॉक डाऊन असल्यामुळे घरातील जवळपास सर्व उपकरणांचा वापर झालेला असेल. मागील वर्षाच्या याच महिन्यामध्ये आपला वापर तपासून बघितला तर ग्राहकांना समजून येईल की, एप्रिल व मे महिन्यामध्ये जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या तीन महिन्याचे सरासरी वीजबिल देण्यात आले होते, जे की, जवळपास थंडीचे दिवस होते. ज्या ग्राहकांचे जुन महिन्याचे मीटरवरील रिडींग व वीज बिलावरील रिडींग चुकीची असेल त्याच ग्राहकांचे वीज बील दुरुस्त होईल.

वेबीनारमध्ये १०२ वीज ग्राहकांनी सहभाग 

नांदेड परिमंडळ कार्यालयाने आयोजीत केलेल्या वेबीनारमध्ये १०२ वीज ग्राहकांनी सहभाग नोंदविला. जिल्हानिहाय तालुकास्तरावरील उपविभागात ता. दोन जुलै ते ता. नऊ जुलै दरम्यान वेबीनारचे आयोजन करण्यात आले आले. वीज ग्राहकांनी सहभाग नोंदविला असता त्यांचे समाधानही वेबीनारव्दारे करण्यात आले. त्यात प्रामुख्याने परभणी, नांदेड व हिंगोली जिल्हयातील वीज ग्राहकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोदवत समाधानही व्यक्त केले.

शंकांचे समाधानही केले 

तसेच, जिल्हानिहाय तालुकास्तरावर वीजग्राहकांनी सहभाग नोंदवून नांदेड मंडळातील ४३०, परभणी मंडळातील २५३ तर  हिंगोली मंडळातील ११४ वीजग्राहकांनी वीज बील योग्य असल्याची खात्री करून घेतली व समाधान व्यक्त केले. सदरील वेबीनार ता. नऊ जुलैपर्यंत तालुकास्तरापर्यंत सुरु राहणार असुन त्याचा वीज ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. शेवटी वीज ग्राहकांनी आपल्या वीजबिला बाबतच्या शंका, संभ्रमाची विचारणा केली असता मुख्य अभियंता श्री पडळकर यांनी सविस्तर माहिती देऊन त्यांच्या शंकांचे समाधानही केले व वीजबिल भरुन महावितरण कंपनीस सहकार्य करण्यात बाबत विनंती केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com