Indian Embassy: मुखेड तालुक्यातील तरुणाचा कुवेतमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. भारतीय दूतावासाकडे सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
मुक्रमाबाद (जि. नांदेड) : मध्यपूर्वेतील कुवेत येथे बिहारीपूर (ता. मुखेड) येथील शेख जुबेर मोहम्मद शेख (वय ३०) याचा ता. चार फेब्रुवारीला संशयास्पद मृत्यू झाला आहे. दरम्यान, याबाबत चौकशी करण्याची मागणी मोहम्मद शेख यांनी केली आहे.