सव्वा तीनशे एकरवर तुतीची नोंदणी; जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या संकल्पनेतून रेशीम उद्योगाला चालना

file photo
file photo

नांदेड : महारेशीम अभियानातंर्गत जिल्ह्यात आजपर्यंत ३२४ एकरवर तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यात मनरेगा तसेच पोकरा अंतर्गत शेतकऱ्यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा रेशीम कार्यालयातून मिळाली.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या संकल्पनेतून रेशीम उद्योगाला चालना मिळावी, यासाठी कृषी संलग्न असलेला तुती लागवड व्यवसायाला प्राधान्य देण्याचे जिल्हा प्रशासनाने ठरविले आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दोन हजार एकरवर तुती लागवडीचे नियोजन केले आहे. नांदेड जिल्ह्यातील वातावरण रेशीम उद्योगास पोषक आहे या रेशीम उद्योगाला वाव मिळावा यासाठी मागील तीन वर्षापासून जिल्ह्यात तुतीची लागवड करण्यात येत आहे. महारेशीम अभियानातंर्गत शेतकऱ्यांना फिरत्या रथातून मार्गदर्शन करण्यात येत आहे. 

परिणामी आजपर्यंत नानाजी देशमुख कषी संजीवनी (पोखरा) अतंर्गत ८७ शेतकऱ्यांनी ८७ एकरसाठी नोंदणी केली आहे. तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत २३७ शेतकऱ्यांनी प्रती शेतकरी एक एकरनुसार ३२७ एकरवर नोंदणी केली आहे. यात नांदेड तालुक्यातील जैतापूर, तुप्पा, पाटनूर, धामदरी व लोणी या पाच गावात ४० एकरवर नोंदणी केली. लोहा तालुक्यातील मदमाची वाडी, पेनूर, हाडोळी, रिसनगाव, जोमेगाव, लोहा, चितळी यात सात गावात ६५ एकरवर नोंदणी झाली आहे. 

कंधार तालुक्यातील बिजेवाडी, गोणार, दहिकळंबा या गावात ३५ एकर, हदगाव तालुक्यातील पांगरी व येवली येथे १८ एकर, किनवट तालुक्यातील आंदबोरी येथे १८ एकर, भोकर तालुक्यातील एकधरी, लगळूद, वाकद, चिदगिरी या गावात ५४ एकर, हिमायतनगरमधील पारवा बु. व मोटरगा या गावात १९ एकर, मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव व पार्डी वैजनाथ या गावात १२ एकर, देगलूर तालुक्यातील सोमून व येडून येथे २३ एकर, बिलोली तालुक्यातील किन्हाळा येथे १५ एकर तर नायगाव तालुक्यातील ताकबिड, मांजरम, नरसी, सागंवी या गावात २३ एकर अशा एकूण ३२४ एकरवर नोंदणी झाली आहे. नोंदणी केलेले शेतकरी तुतीची रोपडे तयार करत असल्याची माहिती मिळाली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com