esakal | नांदेडमध्ये 'बुद्ध पहाट'ची सांगीतिक मेजवानीसह वैचारिक जागरणही
sakal

बोलून बातमी शोधा

बुद्ध पहाट कार्यक्रम नांदेड

नांदेडमध्ये 'बुद्ध पहाट'ची सांगीतिक मेजवानीसह वैचारिक जागरणही

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल अँड कल्चरल मूव्हमेंट आयोजित बुद्ध पहाट या सांगीतिक मेजवाणीतून वैचारिक भरणपोषण करणारे जागरणही मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

'बुद्ध पहाट'चे यंदाचे 13 वे वर्ष असले तरीही कोविडच्या सर्व नियमांचे पालन करीत 'बुद्ध पहाट' हा सोहळा ऑनलाईन प्रक्षेपित करण्यात आला. शहरातील प्रसिद्ध संगीतकार प्रमोद गजभारे यांच्या संयोजनातून हा सोहळा साकारण्यात आला. बुद्ध पहाटच्या प्रारंभी भदंत विनयबोधिप्रिय यांनी उपस्थित सर्व श्रोत्यांना धम्मदेसना दिली. त्यानंतर आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेश गायकवाड यांच्या हस्ते सदरील 'बुद्ध पहाट'चे उदघाटन करण्यात आले.

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारींच्या बातम्या पहा एका क्लिकवर

सदरील सोहळ्याचे आयोजन शहरातील पौर्णिमानगर येथील बुद्ध विहारात हा सोहळा ऑनलाईन प्रक्षेपित करण्यात आला आहे. यावेळी खास आकर्षण म्हणून औरंगाबाद येथील प्रसिद्ध गायिका स्नेहल प्रधान उपस्थित होत्या, तर त्यांच्या समवेत स्थानिक गायक पौर्णिमा कांबळे, नामदेव इंगळे, श्रीरंग चिंतेवार, संजय भगत, गौतम पवार यांनी एकाहून एक सरस गाणी सादर केली.

"बोधिवृक्ष मला, लागली ओढ तुझी, सावली गोड तुझी, सावली गोड तुझी " या नामदेव इंगळे यांच्या गाण्यासाठी प्रेक्षकांनी संयोजकांना संदेश पाठवून वन्स मोअरची दाद दिली. तर स्नेहल प्रधान यांच्या 'किती भीमाच्या सांगाव्या कथा' या गाण्यालाही प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली. यासोबतच ज्ञानसूर्य तू इस जगत का, मन शुद्ध है तन बुद्ध है, निळ्या नभाची निळी सावली, थोर चेला गुरु गौतमाचा, तुझाच गौतमा पडे यासारखी अनेक गाणी एकामागून एक बहारदार पद्धतीने सादर केली.

येथे क्लिक करा - बुद्धांनी जगाला शांततेचा संदेश दिला व मानवतावादी धम्माचे आचरण करण्यास सांगितले.

याप्रसंगी या सोहळ्याचे सूत्रसंचालन कुलदीप नंदूरकर यांनी केले. या सोहळा यशस्वी करण्यासाठी बुद्ध पहाट निर्माता व संयोजक व बुध्द पहाटचे समितीचे अध्यक्ष रोहिदास कांबळे, पञकार प्रकाश कांबळे, सुभाष लोणे, दिनेश सुर्यवशी, टी. पी. वाघमारे, राजकुमार स्वामी, दत्ताहरी धोञे, भागवान गायवाड, सुरेश गजभारे, संजय रत्नपारखी, पी. एस. गवळे, पंडीत अढाव, राजरत्न पवार, धर्मेंद कांबळे, संजय नरवाडे आदीनी परिश्रम घेतले.