election
sakal
नांदेड - न्यायालयीन अपील प्रलंबित असलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील मुखेड व धर्माबाद नगर परिषदांची संपूर्ण निवडणूक तसेच भोकर, लोहा आणि कुंडलवाडी नगर परिषदांच्या प्रत्येकी एका प्रभागातील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. आता या सर्व ठिकाणी २० डिसेंबरला मतदान होणार असून, २१ डिसेंबरला मतमोजणी होईल.