नांदेड : १५ व्या वित्त आयोग निधीचा होतोय चुराडा

आदिवासी वसाहतींना पाणी नाही, नाल्या तुंबल्या : प्रशासकाचे दुर्लक्ष
वित्त आयोग
वित्त आयोगsakal

माहूर : आपलं गाव आपला विकास साध्य करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून ग्रामपंचायतीला १५ व्या वित्त आयोग गावातून लाखो रुपयांचा निधी प्राप्त होतो. त्यातून गावाचा विकास आराखडा आखून आवश्यक ती कामे करण्याला प्राधान्य क्रम देऊन ही विकास कामे गाव कारभाऱ्याने साध्य करावी असे काही निकष या निधीचे आहेत. परंतु माहूर तालुक्यातील वाई बाजार या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक आणि माजी पदाधिकारी यांनी आर्थिक लोभा पोटी लाखो रुपयांचा निधी सुमार दर्जाची कामे करून चुराडा केला आहे.

तालुक्‍यातील सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या वाई बाजार ग्रामपंचायत वर सध्या प्रशासक काम पाहत आहेत. कार्यकाळ पूर्ण झालेल्या ग्रामपंचायत माजी पदाधिकाऱ्यांनी पाच वर्ष केवळ शौचालयात घातल्याने अपेक्षित विकास कामे साध्य करता आले नाही. ज्यात प्रामुख्याने ग्रामपंचायत हद्दीतील खुल्या जागेवर बांधकाम करून व्यापारी संकुल उभारणे, नाल्या दुरुस्त करणे, दुर्लक्षित प्रभाग क्रमांक दोन मध्ये नाल्या व रस्ते बांधकाम करणे, कोलमखेडा गोंडखेडा येथे कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करणे यासह २०१६ च्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करणे इत्यादी कामे प्राधान्यक्रम देऊन पूर्ण करावयाची होती.

मात्र या सर्व उपयुक्त कामांना बगल देत विकास साध्य करण्यासाठी लोकांकडूनच पैसे घेऊन कामे करण्याकडे प्राधान्यक्रम दिल्या गेल्याने अनेक महत्त्वपूर्ण कामे पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही जैसे थेच राहिली. १५ व्या वित्त आयोगातून झालेल्या संपूर्ण कामाची व्यापक चौकशी करून सदर प्रशासकाविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

प्रभाग क्रमांक चारमध्ये समाविष्ट गोंडखेडा येथील आदिवासी बांधवांचा संपूर्ण उन्हाळा पाण्यासाठी भटकंती करण्यात गेला. वाई बाजार येथे मुबलक प्रमाणात पाणी असताना ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात आला नाही. सर्वत्र पाणी टंचाईवर मार्ग काढून टंचाई निवारणाची कामे प्रगतिपथावर होती तर वाई बाजार ग्रामपंचायत मध्ये बोगस कामे करून बिल उचलण्याचा सपाटा सुरू होता, आजही आहे.

- गोविंद पवार, वाई बाजार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com