esakal | नांदेड - २०२ कोरोनामुक्त, १०३ पॉझिटिव्ह, दिवसभरात दोघांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

बुधवारी सायंकाळी एक हजार ३८० जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी एक हजार २५४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर १०३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या १८ हजार ३९४ इतकी झाली आहे.

नांदेड - २०२ कोरोनामुक्त, १०३ पॉझिटिव्ह, दिवसभरात दोघांचा मृत्यू

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - जिल्ह्यातील कोरोना आजारी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी (ता. २१) प्राप्त झालेल्या अहवालात दोन रुग्णांचा मृत्यू झाला तर १०३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्याचबरोबर २०२ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

बुधवारी सायंकाळी एक हजार ३८० जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी एक हजार २५४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर १०३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या १८ हजार ३९४ इतकी झाली आहे. उपचार सुरु असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णामधील अतिशय गंभीर असलेल्या रुग्णांपैकी विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील आरळी (ता. बिलोली) येथील महिला (वय ४०) व खासगी रुग्णालय नांदेड येथे उपचार सुरु असलेल्या इतवारा नांदेडमधील पुरुष (वय ५७) या दोन रुग्णांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात ४९२ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा- आंध्र, तेलगंणात शंभर विशेष रेल्वे तर मराठवाड्यात केवळ तीन

२०२ कोरोनाबाधित रुग्ण बरे 

दरम्यान, दिवसभरात उपचारानंतर विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील पाच, जिल्हा शासकीय रुग्णालय - पाच, पंजाब भवन, यात्रीनिवास, महसूल भवन आणि होम आयसोलेशन मधील १०६, अर्धापूर - पाच, किनवट - ११, धर्माबाद - नऊ, मुदखेड - चार, मुखेड - आठ, बिलोली - तीन, देगलूर - चार, लोहा - दोन आणि खासगी रुग्णालयातील ४० असे २०२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. 

हेही वाचले पाहिजे- राज्यात एक लाख मराठा उद्योजक तयार करणार - नरेंद्र पाटील

एक हजार २७७ बाधितांवर उपचार सुरु 

बुधवारच्या आरटीपीसीआर व अँन्टीजेन टेस्ट किटच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या अहवालात नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात - ६३, नांदेड ग्रामीण - चार, भोकर - एक, मुखेड - पाच, धर्माबाद - दोन, अर्धापूर - तीन, माहूर- सहा, बिलोली - दोन, कंधार - तीन, किनवट - चार, नायगाव - तीन, हदगाव - एक, उमरी - दोन, परभणी - दोन, हिंगोली - एक, यवतमाळ - एक असे १०३ बाधित रुग्ण आढळुन आले. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १८ हजार ३९४ इतकी झाली असून, आजपर्यंत १६ हजार ५०३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या एक हजार २७७ बाधितांवर उपचार सुरु आहेत. त्यामधील ४५ रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. २७२ जणांचा अहवाल येणे बाकी आहे. 

नांदेड कोरोना मीटर 

एकुण पॉझिटिव्ह - १८ हजार ३९४ 
आज बुधवारी पॉझिटिव्ह - १०३ 
एकुण कोरोनामुक्त - १६ हजार ५०३ 
आज बुधवारी कोरोनामुक्त - २०२ 
एकुण मृत्यू - ४९२ 
आज बुधवारी मृत्यू - दोन 
उपचार सुरु - एक हजार २७७ 
गंभीर रुग्ण - ४५ 
प्रलंबित अहवाल - २७२