नांदेडला मंगळवारी ३७ पॉझिटिव्ह तर ३४ कोरोनामुक्त; आठ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर

अभय कुळकजाईकर
Tuesday, 12 January 2021

नांदेडला मंगळवारी (ता. १२) सायंकाळी ६२१ अहवाल प्राप्त झाले त्यापैकी ५७६ अहवाल निगेटिव्ह आले तर ३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २१ हजार ९०६ एवढी झाली आहे. दरम्यान, दिवसभरात एकाही रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची संख्या ६७८ झाली आहे.

नांदेड - कोरोना संसर्गासंदर्भात मंगळवारी (ता. १२) प्राप्त झालेल्या अहवालात ३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या ३५७ जणांवर उपचार सुरू असून त्यापैकी आठ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर आहे. दरम्यान, दिवसभरात एकाचाही मृत्यू झाला नसून ३४ कोरोना बाधित रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी ही माहिती दिली. मंगळवारी (ता. १२) सायंकाळी ६२१ अहवाल प्राप्त झाले त्यापैकी ५७६ अहवाल निगेटिव्ह आले तर ३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २१ हजार ९०६ एवढी झाली आहे. दरम्यान, दिवसभरात एकाही रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची संख्या ६७८ झाली आहे.

हेही वाचा - वेळ अमावस्यानंतर दुसऱ्या दिवशी येणार्‍या करीचा योग आल्याने कार्यकर्त्यांची उत्कंठा वाढली आहे

३४ रुग्णांना औषधोपचारानंतर सुटी
मंगळवारी ३४ कोरोनाबाधित रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे सुटी देण्यात आलेल्या आत्तापर्यंतच्या रुग्णांची संख्या २० हजार ७६७ एवढी झाली आहे. मंगळवारी ३७ अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यामध्ये नांदेड महापालिका क्षेत्रातील २१, नांदेड ग्रामिण एक, लोहा दोन, हदगाव दोन, मुदखेड दोन, माहूर दोन, देगलूर एक, परभणी एक, हिंगोली दोन, निजामाबाद एक आणि यवतमाळ येथील दोन रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचलेच पाहिजे - जिंतूरच्या मीना वाघमारे-पांढरे यांनी गीता आपली मुलगी असल्याचा दावा केला आहे.

३५७ रुग्णांवर उपचार सुरू
सध्या ३५७ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी विष्णुपुरी रुग्णालयात २२, जिल्हा रुग्णालयात २०, नवीन इमारतीत २५, महसूल इमारतीत २१, मुखेडला १७, हदगावला चार, देगलूरला १३, नांदेड महापालिका अंतर्गत गृह विलगीकरात १४०, जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरणात ५५, हैदराबाद येथे संदर्भित दोन आणि खासगी रुग्णालयात ३८ जणांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९४.८१ टक्के आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत विष्णुपुरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १६६ तर नांदेडच्या जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल येथे ६५ खाटा उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. 

नांदेडच्या ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

नांदेड कोरोना मीटर

 • एकूण स्वॅब - एक लाख ९१ हजार ८०५
 • निगेटिव्ह स्वॅब - एक लाख ६५ हजार ८२४
 • एकूण पॉझिटिव्ह - २१ हजार ९०३
 • एकूण बरे - २० हजार ७६७
 • एकूण मृत्यू - ५७८
 • मंगळवारी पॉझिटिव्ह - ३७
 • मंगळवारी बरे - ३४
 • मंगळवारी मृत्यू - शून्य
 • उपचार सुरू - ३५७ 
 • अतिगंभीर रुग्ण - आठ
 • प्रलंबित स्वॅब - ३९७

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded 37 positive, 34 coronal free on Tuesday; The condition of eight patients is critical nanded corona update news