नांदेड : सोमवारी ५९ जण पॉझिटिव्ह; कोरोनावर १४७ रुग्णांची मात 

शिवचरण वावळे
Monday, 10 August 2020

मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत होती. दुसऱ्या बाजुने मृत्यूदरात वाढ झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. परंतू सोमवारी १४७ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे

नांदेड : शहरातील रविवारी (ता.नऊ) प्रलंबित असलेल्या स्वॅब अहवालापैकी सोमवारी (ता. दहा) सायंकाळी ३६९ अहवाल प्राप्त झाले. यात २७४ निगेटिव्ह तर जिल्हाभरात केवळ ५९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. १४७ रुग्णांनी कोरोनावर यशस्विरित्या मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली. 

मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत होती. दुसऱ्या बाजुने मृत्यूदरात वाढ झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. परंतू सोमवारी १४७ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दिवसभरात एकही मृत्यू झाला नसल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

हेही वाचा- नांदेड : व्यवसायिकांनो कोरोना टेस्ट करा अन्यथा दुकाने बंद, आयुक्तांनी काढले आदेश

कोरोना मुक्त १४७ रुग्ण घरी

रविवारी आरटीपीसीआर व ॲँन्टीजेन तपासणी करण्यात आल्या. आरटीपीसीआर ४८ व ॲँन्टीजेन तपासणीत ११ असे ५९ रुग्ण पाझिटिव्ह आले आहे. तर दुसरीकडे सोमवारी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील - दोन, पंजाब भवन कोविड केअर सेंटर- ७०, नायगाव कोविड केअर सेंटर- ३१, देगलूर कोविड केअर सेंटर-१३, कंधार कोविड केअर सेंटर-१, खासगी रुग्णालयातील-१५, किनवट कोविड केअर सेंटर- पाच, मुखेड कोविड केअर सेंटर-चार, धर्माबाद कोविड केअर सेंटर- पाच असे एकूण १४७ रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत. 

हेही वाचा- शेतकऱ्याचं पोर कमावतो महिण्याला लाखो रुपये, कसे? ते वाचाच

एक हजार ४४० रुग्णावर उपचार सुरू

सध्या विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात - १७३, पंजाब भवन कोविड केअर सेंटर- ५५२, श्री गुरुगोविंदसिंघ स्मारक जिल्हा रुग्णालय-४०, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय-३१, यासह नायगाव -३९, बिलोली-२४, मुखेड-१२५, देगलूर-११२, लोहा- आठ, हदगाव- ५०, भोकर-१०, कंधार-१३, धर्माबाद-आठ, किनवट- ४२, अर्धापूर-२०, मुदखेड-१३, हिमायतनगर- २०, माहूर-१६, बारड-चार, खासगी रुग्णालयात-१४३, औरंगाबाद येथे संदर्भित-पाच, निजामबाद संदर्भित - एक व हैदराबाद येथे एक रुग्ण संदर्भित अशा एकूण एक हजार ४४० रुग्णावर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत एक हजार ७७१ रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत. तर रविवारी (ता.नऊ) पर्यंत १२० बाधितांचा मृत्यू झाला आहे. 

 

अशी आहे शहर - तालुका व गाव निहाय बाधित रुग्णसंख्या   
नांदेड वाघाळा महापालीका क्षेत्र- १४ 
लोहा कोविड केअर सेंटर दोन 
 उमरी कोविड केअर सेंटर  एक 
भोकर कोविड केअर सेंटर  दोन 
कंधार कोविड केअर सेंटर एक 
नायगाव कोविड केअर सेंटर चार 
हिंगोली कोविड केअर सेंटर एक 
मुखेड कोविड केअर सेंटर तीन 
बिलोली  कोविड केअर सेंटर  दोन 
नांदेड ग्रामीण कोविड केअर सेंटर चार 
देगलूर कोविड केअर सेंटर एक 
हिमायतनगर कोविड केअर सेंटर एक 
हदगाव कोविड केअर सेंटर आठ 
 किनवट कोविड केअर सेंटर १३ 
परभणी कोविड केअर सेंटर एक
मुदखेड कोविड केअर सेंटर एक 
असे एकूण  रुग्ण एक हजार ४४० रुग्णांवर उपचार सुरू

सोमवार कोरोना मीटर 

जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण-तीन हजार ३५६ 
सोमवारी पॉझिटिव्ह- ५९ 
उपचार सुरु असलेले रुग्णसंख्या- एक हजार ४४० 
घरी सोडण्यात आलेले रुग्ण-एक हजार ७७९ 
आत्तापर्यंत मृत्यू संख्या- १२० 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: 59 Tested Positive 147 Patients Overcome Corona Nanded News