esakal | नांदेड - कोरोनाचे ७५ टक्के रुग्ण धोक्याबाहेर , शुक्रवारी २४७ रुग्ण बरे, २३२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

शुक्रवारी (ता. २५) ९४५ जणांचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये ६७६ निगेटिव्ह, २३२ जण पॉझिटिव्ह आढळुन आले. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या १४ हजार ६६८ इतकी झाली आहे.

नांदेड - कोरोनाचे ७५ टक्के रुग्ण धोक्याबाहेर , शुक्रवारी २४७ रुग्ण बरे, २३२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असला तरी केवळ २५ टक्के कोरोनाबाधित रुग्णांना धोका जाणवत असून ७५ टक्के रुग्ण धोक्याबाहेर असल्याचा निर्वाळा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिला. 

गुरुवारी (ता. २४) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी शुक्रवारी (ता. २५) ९४५ जणांचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये ६७६ निगेटिव्ह, २३२ जण पॉझिटिव्ह आढळुन आले. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या १४ हजार ६६८ इतकी झाली आहे. दिवसभरात विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या सोमठाणा (ता. भोकर) येथील महिला (वय ७०), जिल्हा रुग्णालय शिवरायनगर नांदेड पुरुष (वय ५७) आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या विकासनगर कौठा येथील पुरुष (वय ५४) या तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ३८१ वर पोहचली आहे. 

हेही वाचा- नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओपदी वर्षा ठाकूर ​

आतापर्यंत दहा हजार ६९७ रुग्ण कोरोनामुक्त 

दहा दिवसाच्या उपचारानंतर शुक्रवारी श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक शासकीय रुग्णालयातील आठ, विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील सात, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन व होम क्वॉरंनटाईनमधील ४६, बिलोलीत आठ, धर्माबादला नऊ, मुखेडला २३, भोकरचे २८, कंधारचे पाच, किनवटचे २९, लोह्यातील दोन, नायगावचे आठ, हदगावचे १२, मुदखेडचे ३८ व खासगी रुग्णालयातील १४१ असे २४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत दहा हजार ६९७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 

हेही वाचा- नांदेड : लाचखोर ग्रामविस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात ​

तीन हजार ५१९ रुग्णांवर उपचार सुरु 

गुरुवारी आरटीपीसीआर व अँन्टीजेन टेस्ट किटच्या माध्यमातून करण्यात आलेल्या तपासणीत नांदेड वाघाळा महापालिका हद्दीतील ११६, नांदेड ग्रामीणचे आठ, माहूरचा एक, अर्धापूरचे सहा, धर्माबादचे १४, उमरीचे सहा, हिमायतनगरचे एक, हदगावचे सहा, किनवटचे दहा, बिलोलीतील पाच, भोकरचे तीन, मुखेडचे २५, नायगावचे सहा, लोह्यातील १४, मुदखेडला तीन, कंधारला दोन, परभणीचा एक, हिंगोलीचे चार, यवतमाळचा एक असे २३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 
जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा १४ हजार ६६८ वर पोहचला आहे. त्यापैकी दहा हजार ६९७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, सध्या तीन हजार ५१९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. उपचार सुरु असलेल्या रुग्णांपैकी ५३ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. 

नांदेड कोरोना मीटर 

एकुण कोरोना पॉझिटिव्ह -१४ हजार ६६८ 
आज शुक्रवारी पॉझिटिव्ह - २३२ 
एकुण कोरोनामुक्त - १० हजार ६९७ 
आज शुक्रवारी कोरोनामुक्त - २४७ 
एकुण मृत्यू - ३८१ 
आज शुक्रवारी मृत्यू - तीन 
सध्या उपचार सुरु - तीन हजार ५१९ 
गंभीर रुग्ण - ५३ 
प्रतिक्षेत अहवाल - एक हजार ३७९