
रविवारी (ता.२५) एक हजार १२९ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यात ९९९ निगेटिव्ह १०१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णाची संख्या १८ हजार ७५३ इतकी झाली आहे.
नांदेड - ९५ टके रुग्णांनी केली कोरोनावर मात, रविवारी १२४ रुग्ण कोरोनामुक्त, १०१ पॉझिटिव्ह एकाचा
नांदेड - दिवसागणीक कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. सध्या ९५ टके कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी आजारावर मात केली आहे. उपचारानंतर ९५ टक्क्यापेक्षा अधिक बाधित कोरोनामुक्त झाल्याने, सध्यास्थितीमध्ये ९०५ कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. रविवारी (ता.२५) एकाचा मृत्यू, १०१ जण पॉझिटिव्ह, तर १२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
शनिवारी (ता.२४) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी रविवारी (ता.२५) एक हजार १२९ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यात ९९९ निगेटिव्ह १०१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णाची संख्या १८ हजार ७५३ इतकी झाली आहे. विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या लोहा तालुक्यातील धानोगा भुजबळ येथील महिला (वय ४५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत उपचारादरम्यान ५०० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा- नांदेड : सचखंड गुरुव्दावाराचा हल्लाबोल संपन्न
१७ हजार २१९ रुग्णांची कोरोनावर मात
उपचारानंतर शनिवारी विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील- ८, श्रीगुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय- १०, पंचाब भवन, यात्री निवास, महसूल भवन आणि होम आयसोलेशन मधील - ६५, देगलूर- एक, हदगाव- चार, माहूर- चार व खासगी कोविड केअर सेंटरमधील ३०, असे १२४ कोरोनाबाधित रुग्ण औषधोपचाराने पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालय आणि होम आयसोलेशनमधून कोरोना मुक्त घोषित करण्यात आले. एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी आतापर्यंत १७ हजार २१९ रुग्णांनी कोरोनावर यशस्विरित्या मात केली आहे.
हेही वाचले पाहिजे- कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील व्यायामशाळा सुरु करण्यासाठी परवानगी
४७८ स्वॅबची तपासणी सुरू
रविवारच्या स्वॅब अहवालात नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात- ६४, नांदेड ग्रामीण- तीन, अर्धापूर-एक, धर्माबाद- एक, भोकर- दोन, लोहा- पाच, माहूर- एक, मुखेड-एक, नायगाव- एक, मुदखेड- एक, किनवट- १३, हदगाव- एक, कंधार- एक, जालना- एक, निजामाबाद- एक, ङिंगोली- दोन, यवतमाळ- एक, सोलापूर- एक असे १०१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८ हजार ७५३ वर पोहचली आहे. सध्या ९०५ कोरोना बाधितांवर उपचार सुरू असून, ३३ कोरोना बाधित रुग्णांती प्रकृती गंभीर आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत ४७८ स्वॅबची तपासणी सुरू होती.
कोरोना मीटर ः
रविवारी पॉझिटिव्ह - १०१
रविवारी कोरोनामुक्त - १२४
रविवारी मृत्यू - एक
एकूण पॉझिटिव्ह - १८ हजार ७५३
एकूण कोरोनामुक्त - १७ हजार २१९
एकूण मृत्यू - ५००
Web Title: Nanded 95 Patients Overcome Coli Sunday 124 Patients Were Corona Free And 101 Were
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..