नांदेड : गावठी कट्टा आणि एअरगण पिस्टलसह आरोपी जाळ्यात- स्थागुशाची कारवाई

प्रल्हाद कांबळे
Saturday, 14 November 2020

या सुचनेवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ऐन दिवाळीत सापळआ रचुन एका अट्टल गुन्हेगाराला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एअरगण पिस्टल जप्त केले. आरोपी हा आष्टी (ता. हदगाव) येथील रहिवाशी आहे.

नांदेड : शहरात व परिसरात अवैध शस्त्र बाळगणार्‍या आरोपीतांची माहिती काढून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबतच्या सूचना पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या. या सुचनेवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ऐन दिवाळीत सापळआ रचुन एका अट्टल गुन्हेगाराला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एअरगण पिस्टल जप्त केले. आरोपी हा आष्टी (ता. हदगाव) येथील रहिवाशी आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आपले सर्व पथक शहर व जिल्ह्यात कार्यरत केले. फरार व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध आणि विविध गुन्ह्यातील मुद्देमाल वसुल करण्यासाठी कंबर कसली आहे. श्री. चिखलीकर यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन त्यांनी ता. १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी शहरातील भावसार चौक परिसरात आपले पथक पाठविले. पथक प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील नाईक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी सापळा लावला. भावसार चौक परिसरात किरायाने राहणाऱ्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि एक एअरगण असा तीस हजाराचे घातक शस्त्र जप्त केले. 

हेही वाचा -  परभणी : सेलूत शुध्द पाण्याच्या नावाखाली तेजीत गोरखधंदा.अनेकांकडे परवानगीच नाही

सचीन शिंदे हा सराईत गुन्हेगार

पथकाने सचिन परमेश्वर शिंदे (वय १९) राहणार आष्टी, तालुका हदगाव, हल्ली मुक्काम भावसार चौक नांदेड असे त्याचे नाव आहे. त्यांची अंगझडती घेतली असता कमरेला लावलेले वरील घातक शस्त्र विनापरवनगी बाळगत होता. एपीआय सुनील नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यांनी घेतले परिश्रम

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील नाईक, हवालदार दशरथ जांभळीकर, संजय केंद्रे, गंगाधर कदम, सुरेश घुगे, अफजल पठाण, हनुमंत पोतदार, बालाजी तेलंग, बालाजी यादगिरवार, विलास कदम, रणधीर राजबन्सी, तानाजी यळगे, रवी बाबर, संजय जिंकलवाड, विठ्ठल शेळके, देवा चव्हाण आणि हेमंत बीचकेवार यांनी पार पडली. या पथकाचे पोलिस अधीक्षक श्री शेवाळे यांनी कौतुक केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Accused nabbed with Gawthi Katta and Airgun pistol nanded news