नांदेड : सराफा दरोडा प्रकरणातील आरोपींना पोलिस कोठडी 

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 26 August 2020

अमरावती पोलिसांनी अटक करुन न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नांदेड पोलिसांच्या स्वाधीन केले होते.

नांदेड : शहराच्या दत्तनगर येथील एका सराफा दुकानावर भरदुपारी नुकताच कारागृहातून जामीनावर सुटलेल्या दरोडेखोरांनी दरोडा टाकून सहा लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास करून फरार झाले होते. त्यांना अमरावती पोलिसांनी अटक करुन न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नांदेड पोलिसांच्या स्वाधीन केले होते. शिवाजीनगर पोलिसांनी या तिघांना मंगळवारी (ता. २५) न्‍यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने गुरुवारपर्यत (ता. २७) पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

अमरावती पोलिसांच्या कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींना नांदेड पोलीसांनी सर्व कायदेशीररित्या आपल्या ताब्यात घेतले. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहूळे यांच्या पथकांनी त्यांना अमरावतीहून नांदेडला आणले. त्यांची कसुन चौकशी केली. या आरोपीनी दत्तनगर येथील मुक्तेश्वर शहाणे यांच्या श्री स्वामी समर्थ ज्वेलर्स नावाच्या दुकानावर ता. २९ जुलै रोजी हल्ला करुन त्यांना जखमी करुन नगदी रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण सहा लाख ७५ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.

हेही वाचा नांदेडचा हा किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर, कोणता ते वाचा?

अमरावती पोलिसांनी अटक केली होती

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपी फरार झाले होते. दरम्यान यातील आरोपीने अमरावती गाठले. ता. १८ ऑगस्ट रोजी अमरावती शहरातील दसरा मैदानाजवळील झोपडपट्टी परिसरात अमरावती पोलिसांनी अटक केली होती. त्यात वीरसिंग सरदार, शुभम ओमप्रकाश जाधव आणि अनिकेत बालाजी सूर्यवंशी तिघे राहणार नांदेड यांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस, फायर केलेले काडतुस, दुचाकी व एक खंजर जप्त केले होते. या दरोडेखोरांनी नांदेड येथील सराफाच्या दुकानावर टाकलेल्या दरोड्याची कबुली दिल्याचे पोलिसांना सांगितले.

न्यायालयाने तिघांनाही पोलिस कोठडीत पाठविले 

तिन्ही आरोपींना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून नांदेड पोलीसांनी त्यांना ताब्यात घेऊन नांदेड गाठले. येथे त्यांची कसुन चौकशी केली. मात्र त्यांच्याकडून काही मुद्देमाल हस्तगत झाला नाही. त्यामुळे त्यांना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने तिघांनाही पोलिस कोठडीत पाठविले आहे. त्यांच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता रवि वाहूळे यांनी वर्तविली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Accused in Sarafa robbery case remanded in police custody Nanded news