esakal | नांदेड : अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड नगरला तर विजय कबाडे भोकरला
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

१५२ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाचे सचिव कैलास गायकवाड यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहेत.या बदल्या आदेशात मात्र १२ अधिकाराऱ्यांना पदस्थापना दिल्या नसल्याने त्यांना काही काळ वेटींगवर राहावे लागणार आहे. 

नांदेड : अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड नगरला तर विजय कबाडे भोकरला

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : राज्य सरकारने बुधवारी (ता. ३०) सप्टेंबर रोजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात दोन उपमहानिरीक्षक, दहा पोलिस अधीक्षक, २९ अतिरिक्त पोलिस अधीक्षक आणि १०५ पोलिस उपअधीक्षक अशा १५२ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाचे सचिव कैलास गायकवाड यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहेत.या बदल्या आदेशात मात्र १२ अधिकाराऱ्यांना पदस्थापना दिल्या नसल्याने त्यांना काही काळ वेटींगवर राहावे लागणार आहे. 

नांदेड जिल्ह्यातील भोकरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार यांनाही पदस्थापना देण्यात आली नाही. मत्र त्यांच्या जागी विजय कबाडे यांना पाठवले आहे. नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांना अहमदनगर येथे पाठवण्यात आले आहे. राज्य सरकारने काढलेल्या आदेशात नांदेडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना पोलीस अधीक्षक महामार्ग सुरक्षा पुणे येथे नियुक्ती दिली आहे. भारतीय पोलीस सेवेतील डॉ. अक्षय शिंदे आणि नूरुल हसन यांना उपायुक्त नागपूर शहर अशी नियुक्ती दिली आहे.

हेही वाचाआगामी नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा- डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शक सूचना

जिल्ह्यातील तीन उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
 
सोबतच १६ पोलिस अधीक्षकांना निवडश्रेणीत पदोन्नती देत नियुक्ती दिली आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक पदावर बीडचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांची नियुक्ती केली आहे. विजय कबाडे यांनी यापूर्वी नांदेड शहर उपविभागात सेवा दिली होती. विजय पवार आणि इतर बारा अधिकाऱ्यांना नियुक्ती विना ठेवण्यात आले आहेत. भोकर उपविभागात गोपाल रांजणकर यांना नियुक्ती देण्यात आली आहे. धर्माबाद पोलीस उपाधीक्षक सुनील पाटील हे अंबड जिल्हा जालना येथे जाताहेत. इतवारा उपविभागाचे धनंजय पाटील आता भोर, जिल्हा पुणे येथे तर शहर उपविभागाचे पोलीस उपाधिक्षक अभिजीत फसके यांना बार्शी उपविभाग, जिल्हा सोलापूर येथे पाठविण्यात आले आहेत. या ठिकाणी नवीन पोलीस उपाधीक्षक अद्याप नियुक्त करण्यात आलेले नाहीत.