Nanded News: ‘सत्याग्रहिंना चिरडण्याचा प्रयत्न’ घटनेशी प्रशासनाचा कुठलाही संबंध नाही ; सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले | Nanded Administration attempt crush satyagrahis incident Assistant Collector Neha Bhosale | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

Nanded News : ‘सत्याग्रहिंना चिरडण्याचा प्रयत्न’ घटनेशी प्रशासनाचा कुठलाही संबंध नाही ; सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले

माहूर (जिल्हा नांदेड) : माहूर व किनवट तालुक्यातील आदिवासी कोळी महादेव जमातीचे जात प्रमाणपत्र तात्काळ निर्गमित करण्याबाबत आदिवासी कोळी महादेव समाज बांधवांचे (ता.८)मार्च पासून सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालय किनवट समोर सत्याग्रहाचे आयोजन केलेले आहे.

या सत्याग्रहाच्या ठिकाणी (ता.१३) रोजी रात्री बारा वाजताच्या सुमारास आंदोलकावर भरधाव वेगाने वाहन घुसवून आंदोलकांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यासंदर्भात खाजगी गुंडाकरवी उपविभागीय अधिकारी कार्यालयाने आंदोलन चिरडण्यासाठी हा प्रयत्न केल्याचे अफवा पसरविल्या जात आहे.त्या पार्श्वभूमीवर सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांनी या घटनेवर आपल्या कार्यालयाची बाजू स्पष्ट केली आहे.

माहूर किनवट तालुक्यातील आदिवासी महादेव कोळी समाजाच्या लाभार्थ्यांना सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय किनवट कडून सुलभरीत्या जात प्रमाणपत्र निर्गमित केले जात नसल्या कारणाने आदिवासी कोळी कर्मचारी विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष परमेश्वर गोणारे यांच्या नेतृत्वात न्याय हक्काच्या मागण्यासाठी सत्याग्रह सुरू आहे.

१३ मार्चच्या रात्री १२ वाजताच्या सुमारास अज्ञात माथेफिरू ने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोरील आंदोलकाच्या टेन्टला पांढऱ्या रंगाच्या विस्टा गाडीने धडक देऊन भरधाव निघून गेला.सदर घटनेसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाने भाडोत्री गुंडाकरवी ही घटना आंदोलन चिरडण्यासाठी घडून आणल्याच्या

अफवा समाज माध्यमावर वाऱ्यासारखी पसरविली जात असल्याने या प्रकरणावर सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नेहा भोसले यांनी बाजू स्पष्ट करत विशेषत्वे जाती जमाती संवर्गातील जात प्रमाणपत्रे निर्गमित करताना संबंधित अर्जदाराने जात प्रमाणपत्र संचीकेसोबत कार्यालयात संचिका सादर करताना आवश्यक ती कागदपत्रे व संदर्भीय पुरावे सादर करणे अर्जदार यांच्यावर बंधनकारक आहे.

अर्जदारांनी जर योग्य ते पुरावे सादर केले नसल्यास कार्यालयास संदर्भीय प्रमाणपत्र निर्गमित करण्यास प्रशासकीय अडचण निर्माण होते.त्यामुळे उपविभागीय अधिकारी कार्यालय व विशेषताः

संबधित अधिकारी हे जमातीचे प्रमाणपत्र देण्यात टाळाटाळ किंवा विलंब करत नसून या प्रकरणात कुठल्याची दुद्वेष भावनेतून कुठलीही पक्षपाती भूमिका महादेव कोळी जमातीबद्दल प्रशासनाने घेतलेली नाही.

तसेच संबधिताचे जातीचे प्रमाणपत्र अर्जदार यांनी सर्व परिपूर्ण कागदपत्रे व पुरावे सादर केल्यानंतर संबधिताचे जमातीचे प्रमाणपत्र नियमानुसार विहित कालावधीत निर्गमित करण्यात येतील.असे स्पष्टीकरण दिले आहे.

आंदोलन स्थळी ता.१३ रोजी रात्री पांढऱ्या रंगाची कार सत्यागृहिच्या टेन्ट मध्ये घुसविण्यात आली व त्याद्वारे सत्याग्रहीना चिरडण्याचा प्रयत्न स्थानिक गुंडांना हाताशी धरून प्रशासनाने केला याबाबत पोलीस स्टेशनच्या चौकशी अहवालाकडे लक्ष वेधले असता संबंधित कार चालक हा मद्यप्राशन करून कार चालवीत होता

किनवट गोकुदा रोड वरून तालुक्यात पुढे जाताना संबंधितानी ईतर ठिकाणी सुद्धा किरकोळ अपघात केले आहेत.उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच तालुका प्रशासनाविषयी हेतूपुरस्सर प्रशासनाची प्रतिमा मलीन,करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

यावर किनवट उपविभागातील संबंधित जमाती संवर्गातील अर्जदार व रहिवासी यांनी या कार्यालयाची भूमिके बाबत खोट्या अफवावर विश्वास ठेवून नये असे प्रशासनातर्फे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

करिता समाज माध्यमावरील तालुका प्रशासनाच्या विरोधात येणाऱ्या विशेषतः उपविभागीय अधिकारी कार्यालय किनवट यांच्या बाबतच्या सर्व विरोधी बातम्याचे व अफवांचे मी नम्रपणे खंडन करते.

नेहा भोसले (भा.प्र.से.),सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,

किनवट.