‘ओपन जीम’ ची संकल्पना चांगली पण...

नियोजन नसल्याने अडचणी; प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
Nanded administration need pay attention to open gym
Nanded administration need pay attention to open gymsakal

नांदेड : सुदृढ व निरोगी शरीरासाठी व्यायाम हवा असतो. कोरोनानंतर तर निरोगी आयुष्य जणू सर्वांसाठीच महत्वाचे बनले आहे. त्यासाठी सरकारने शासकीय, निमशासकीय तसेच सार्वजनिक जागेवर कोट्यावधी रुपये खर्च करुन ‘ओपन जीम’ ही संपल्पना प्रत्यक्षात आणली आहे. नांदेड शहर आणि जिल्ह्यात देखील अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालय परिसर व सार्वजनिक जागेत ओपन जिम सुरु केल्या आहेत. परंतु नांदेडकरांना अजून तरी ‘ओपन जिम’ची संकल्पना तितकीची अंगवळणी पडलेली दिसून येत नाही.

सकाळी तसेच संध्याकाळच्या वेळी घराबाहेर फिरण्यास गेलेल्या नागरिकांना ओपन जिम अगदी सहज उपलब्ध आहे. त्यासाठी नागरीकांना कुठलेही पैसे मोजावे लागू नयेत म्हणून शासनाने विविध मोक्याच्या ठिकाणी या जीमची उभारणी केली. मात्र अनेक तरुण सायंकाळच्या वेळी व्यायाम करण्याच्या साहित्यावर बसून मोबाईलवर गप्पा मारताना दिसत आहेत.

त्यांच्यामुळे वयाने ज्येष्ठ असलेल्या नागरीकांना देखील सर्व प्रकार दूरुनच बघावा लागतो. दुसरीकडे आईच्या हाताला धरुन घराबेहर आलेली लहान मुले जमेल त्या खेळण्यावर चढण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. मोठ्यांना ओपन जिमची संकल्पना रुजवून घेण्यास काही दिवस लागतील. मात्र, लहान मुलांना या ओपन जिमचा चांगलाच लळा लागला आहे. उन्हाचा पारा कमी होताच मुले आई वडिलांसोबत थेट जवळच्या मैदानावरील ओपन जिममध्ये रममान होताना दिसून येत आहेत.

मात्र, कोट्यावधी रुपये खर्चून उभारलेल्या या जिममधील साहित्यांची तोडफोड किंवा नासधुस होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक असून त्यासाठी संबंधित प्रशासनाच्या वतीने ओपन जिमच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करणे गरजेचे आहे. जेणेकरुन मोबाईलवर बोलत जिमच्या साहित्यावर तासनतास बसणाऱ्या तरुणाईला बाजूला करुन गरजवंतांना ‘ओपन जिम’चे साहित्य व्यायामासाठी उपलब्ध करुन देता येतील आणि नांदेडकरांमध्ये ‘ओपन जिम’ची संकल्पना रुजवण्यास वेळ लागणार नाही.

‘ओपन जिम’ ही संकल्पना सर्वांच्या आरोग्यासाठी खूप छान आहे. ‘ओपन जिम’ हे लहान मुले, ज्येष्ठ नागरीक व महिलांसाठी देखील महत्वाचे आहे. त्याचा अनेकजण आनंद घेत आहेत. परंतु इथल्या महागड्या साहित्याची कुणाकडुन नासधुस होणार नाही. याची महापालिकेने खबरदारी घेतली पाहिजे व नागरीकांना वर्षानुवर्ष ही सेवा मिळत राहिली पाहिजे.

- गोपळ रायबोले, नागरीक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com