esakal | नांदेड : महिला व बालविकास विभागातर्फे दत्तक सप्ताह आजपासून
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

या शिशुगृहात शुन्य ते 6 वर्षे वयोगटातील बालक असतात. तसेच परित्याग केलेले सोडून दिलेले किंवा सापडलेले बालकांना शिशुगृहात प्रवेश दिला जातो. त्यानंतर पुढील 60 दिवसात संबंधित पालकांनी संपर्क साधला नाही तर ते मुल दत्तक देण्यासाठी कायद्याने मान्यता प्राप्त होते.

नांदेड : महिला व बालविकास विभागातर्फे दत्तक सप्ताह आजपासून

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षातर्फे 14 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत दत्तक सप्ताह राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात उन्नतीशिल महिला मंडळ संचलित लोहा तालुक्यातील सावित्रीबाई फुले शिशुगृह लोहा व नरसाबाई महिला मंडळ संचलित शिशुगृह गितानगर आनंदनगर नांदेड या दोन विशेष दत्तक संस्थांना शासकीय मान्यता प्राप्त आहे.

या शिशुगृहात शुन्य ते 6 वर्षे वयोगटातील बालक असतात. तसेच परित्याग केलेले सोडून दिलेले किंवा सापडलेले बालकांना शिशुगृहात प्रवेश दिला जातो. त्यानंतर पुढील 60 दिवसात संबंधित पालकांनी संपर्क साधला नाही तर ते मुल दत्तक देण्यासाठी कायद्याने मान्यता प्राप्त होते. इच्छूक पालकांना अपेक्षेनुसार बालकाची दत्तक प्रक्रिया केंद्रीय दत्तक ग्रहण संसाधन प्राधिकरण (CARA) www.cara.nic.in या संकेतस्थळावर कायदानुसार ऑनलाईन नोंदणी करण्यात येते.

नांदेड जिल्ह्यात परित्याग केलेले सोडून दिलेले किंवा सापडलेला अशा बालकांना जिल्हा महिला व बाल विकास कार्यालया अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष शास्त्रीनगर भाग्यनगर जवळ नांदेड येथे 02462-261242 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती आर. पी. काळम आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांनी केले आहे.

हेही वाचा -  नांदेड जिल्ह्यात एक हजार १९२ कोटींची कर्जमाफी -

कोविड-19 च्या सुरक्षा निर्देशासह  कौमी एकता सप्ताह होईल साजरा

दरवर्षीप्रमाणे 19 ते 25 नोव्हेंबर हा सप्ताह “कौमी एकता सप्ताह” म्हणून साजरा केला जातो. नांदेड जिल्ह्यात कोविड-19 च्या प्रादुर्भाव असल्यामुळे कोविड-19 च्या सुरक्षेच्या उपाय योजनाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाने निर्गमित केलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन “कौमी एकता सप्ताह” साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्देश दिले आहेत. याबाबत दिनांक 14 नोव्हेंबर 2017 रोजीचे शासन परिपत्रक www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक 20161111168419814 असा आहे.

loading image
go to top