नांदेड : अप्रमाणित बियाण्याच्या कंपनीवर कारवाई करा

संतोष गव्हाणे : कृषी आयुक्त धीरजकुमार यांना दिले निवेदन
Nanded Agriculture Commissioner action against uncertified seed company
Nanded Agriculture Commissioner action against uncertified seed companysakal

अर्धापूर : जिल्ह्यातील कृषी विभागाने सोयाबीन बियाण्यांचे नमुने घेतले होते. त्यामधील अनेक प्रसिद्ध कंपन्यांचे बियाण्याचे नमुने अप्रमाणित असल्याचे प्रयोगशाळेमध्ये सिद्ध झाले. बियाण्यांची उगवण सक्षमता नसल्याचे सिद्ध झाले होते. अशा कंपन्यांवर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या शेतकरी आघाडीचे राज्य अध्यक्ष संतोष गव्हाणे यांनी कृषी आयुक्त धिरजकुमार यांना निवेदन देवून रविवारी (ता. २६) केली.

राज्याचे कृषी आयुक्त धिरजकुमार हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांनी मालेगाव (ता.अर्धापूर) नांदेड तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इकनकर, जिल्हा कृषी अधीक्षक रवीशंकर चलवदे आदी अधिकरी होते. नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात बोगस बियाण्यांचे प्रकरण उघडकीस आले आहेत, तसेच खतांची लिंकिंग होत असल्याच्या तक्रारीही आहेत. संभाजी ब्रिगेडच्या शेतकरी आघाडीचे राज्य अध्यक्ष संतोष गव्हाणे यांनी निवेदन देवून मागणी केली आहे की, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदरील दोषी कंपन्यांचे बियाणे विक्रीस बंदी घालणे आवश्यक होते. पण अधिकाऱ्यांनी कसलीही कार्यवाही त्या कंपन्यांवर केलेली नाही. त्यामुळे जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी विकास अधिकारी, विभागीय नियंत्रण अधिकारी व यास जबाबदार असलेल्या ईतर सर्व कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे किंवा शासनास तसा अहवाल द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com