Nanded : एड्सबाबत जनजागृती आवश्यक

डाॕ. नागेश लखमावार; बिलोलीत जनजागृती फेरी
Nanded
Nanded Sakal

बिलोली : एड्सची बाधा झालेल्या व्यक्तिंसोबत हस्तादोंलन, स्पर्श केल्याने, जेवण केल्यास एड्स हा रोग होत नाही. या बाबत लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत. एड्स बाबत गैरसमज दूर करण्यासाठी फेरीच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन बिलोली येथील उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॕ. नागेश लखमावार यांनी केले.

जागतिक एड्स दिनानिमित्त गुरूवारी (ता. एक) उप जिल्हा रुग्णालय, अल इम्रान प्रतिष्ठान बिलोली व आयसीटीसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने फेरी काढून जनजागृती करण्यात आली. यावेळी डाॕ. लखमावार बोलत होते.

अल इम्रान प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहसीन खान म्हणाले की, या रोगापासून बचाव करण्यासाठी एखाद्या व्यक्तींने वापरलेली सुई पुन्हा वापरु नये, एड्स झालेल्या व्यक्तिचे रक्त दुस-या व्यक्तींच्या शरीरात गेले तर हा विषाणू पसरु शकतो. यावेळी फेरीला वैद्यकीय अधीक्षक डाॕ. लखमावार यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.

सदरिल फेरी दवाखान्यातून, बाजार गल्ली, वरटी गल्ली, छोटी गल्ली, विठ्ठल मंदिर, गांधी चौक ते पुन्हा रुग्णालय येथे येऊन समारोप करण्यात आला. या फेरीत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय व ओंकार नर्सिंगच्या विद्यार्थींनींनी वेगवेगळे घोषवाक्य सांगितले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॕ. विजयकुमार मोरे, पत्रकार भिमराव बडूरकर, सय्यद रियाज, कल्पना ठाकुर, विमल कुडमुते, अनुसया चव्हाण, विद्या पवार, मोहिनी साबदे, वर्षा काशिंदे, ममता स्वामी, कस्तुरबा गांधी विद्यालयाच्या शिक्षिका शारदा हनुमंते, ओंकार नर्सिंग काॕलेजच्या शिक्षिका वेदिका ढोणे, कर्मचारी श्रीरंग स्वामी, राजेंद्र अनमुलवाड, एनसीडी समुपदेशक दिनेश तळणे आदींची उपस्थिती होती. एड्स दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष खान, आयसीटिसीचे समुपदेशक देवीदास भोईवार, प्रयोगशाळा तंञज्ञ शेख मोहमंद आदींनी परिश्रम घेतले. मोहसीन खान यांनी सुत्रसंचलन करून आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com