नांदेड : विमानतळ पोलिसांकडून दोन दुचाकीसह चोरटा अटक

file photo
file photo

नांदेड : शहरात मागील काही दिवसापासून दुचाकी चोरीच्या घटनात प्रचंड वाढ झाली आहे. या घटनांवर प्रतिबंध बसावा म्हणून पोलिस अधीक्षकांनी संबंधित ठाणेदारांना कडक सूचना देऊन दुचाकीस्वारांचा बीमोड करण्याचे सांगितले. यावरुन विमानतळ पोलिसांनी आपल्या ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील चोरलेली दुचाकी जप्त केली. तसेच चोरणाऱ्या चोरट्यास अटक करुन त्याच्याकडून दुसरीही एक दुचाकी जप्त केली आहे.

नांदेड शहरातील विविध भागात गर्दीच्या ठिकाणाहून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. अनेकवेळा पोलिस ठाण्यात अशा प्रकारच्या घटना दाखल करण्यात येत नसल्याच्या तक्रारी येत असतात. त्यामुळे वाहनधारकसुद्धा त्रस्त झाले आहेत. विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेट सांगवी तालुका लोहा येथील विद्यार्थी ऋषिकेश वानखेडे (वय २२) याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. या प्रकरणाची नोंद विमानतळ पोलिस ठाण्यात झाली होती. 

पोलिस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या. शहराच्या शिवनगर भागात राहणारा आतिष विष्णू सूर्यवंशी (वय २०) याला बुधवारी ( ता. २७) रात्री अटक केली. त्याच्याकडून ऋषिकेश वानखेडे याची चोरलेली पल्सर दुचाकीसह दोन दुचाकी जवळपास एक लाख ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. आतीष सूर्यवंशी याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीत पाठवले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार श्री कुर्लेकर करत आहेत. या चोरट्याकडून अजून काही चोरीच्या दुचाकी जप्त होम्याची शक्यता पोलिस निरीक्षक श्री. काकडे यांनी व्यक्त केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com