नांदेड : अर्धापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग, पालकमंत्री अशोक चव्हाणांचा हिरवा कंदील

file photo
file photo

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : नगरपंचायतीची सार्वत्रिक निडणुक एक वर्षावर आली असतांना काॅग्रेसच्या ताब्यात असलेल्या नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष बदल करण्याचे वारे वाहू लागले आहेत. या नगराध्यक्ष बदलण्यास पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी हिरवा कंदील दाखवला असल्याची माहिती विश्वसनीय सुत्राकडून मिळाली आहे. पण एक काॅग्रेसच्या एका गटाने विद्यमान नगराध्यक्षा सुमेरा बेगम शेख लायक यांना अभय दिल्याने पुढील काळात नाट्यमय राजकीय घडामोडी होण्याची शक्यता वर्तण्यात येत आहे.

उत्सुक नगराध्यक्षांचे प्रतिनिधी, काही नगरसेवकांनी मुंबईत पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेवून आपली भूमिका मांडली आहे. या निमीत्ताने काॅग्रेसच्या नगरसेवकातील गटबाजी उघड होत आहे. या सर्व घडामोडींवर भाजप लक्ष ठेवून असून योग्य संधीची वाट पाहत आहेत. तर काॅग्रेसच्या नगरसेवकामधील एक गट पक्षातील वरिष्ठ नेत्यांना आव्हान देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय गटात आहे.

अर्धापूर नगरपंचायत स्थापनेपासून  काॅग्रेसच्या ताब्यात आहे. असे असले तरी काॅग्रेसचा शहरातील जनाधार सातत्याने कमी होत असतांना स्थानिक नगरसेवकात गटबाजी वाढतच चालली आहे. या गटबाजीतुनच नगराध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

नगरपंचायतीमध्ये एकूण १७ सदस्य असून दहा काॅग्रेस, चार राष्ट्रवादी काॅग्रेस, दोन एमआयएम व एक अपक्ष असे पक्षीयबलाबल आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपत प्रवेश केला आहे. काॅग्रेसच्या ताब्यात नगरपंचायत असली तरी स्थानिक काॅग्रेसच्या नगरसेवकात नाराजी व गटबाजी असल्यामुळे दिड वर्षापुर्वी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनुभवी जेष्ठ नगरसेवक असलेल्या मुसबीर खतीब यांना डावलून सुमेरा बेगम शेख लायक यांना नगराध्यक्ष करण्यात आले. ज्यांनी सुमेरा बेगम यांना नगराध्यक्ष केले तेच आता नगराध्यक्ष बदलण्याच्या हालचालीत प्रमुख आहेत. नगराध्यक्षपदाची सुत्र आपल्याच हाती राहतील या आशेने नगराध्यक्ष केले होते. अशा नगरसेवकांचा चांगलाच भ्रमनिरास झाल्याने नगराध्यक्ष बदलण्याचा घाट घातल्या जात आहे. या गटबाजीत विकास कामांना खिळ बसत आहे. याकडे लक्ष देण्यासाठी नगरसेवकांना वेळ मिळत नाही .

नगराध्यक्ष बदलण्याची मागणी गेल्या तीन महिण्यापुन सुरु अहे. या विषयांवर चर्चा करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी एक प्राथमिक बैठक झाली होती. त्यानंतर काही दिवसापुर्वी काही नगरसेवकांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांची मुंबईत भेट घेऊन या विषयांवर चर्चा केली आहे. पालकमंत्र्यांनी बदल करण्यासाठी होकार दिल्याची माहिती विश्वसनीय सुत्राकडून मिळाली आहे. सार्वत्रिक निवडणूक एक वर्षावर आली असतांना हा बदल कशासाठी करायचा व याचा फायदा काय होणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. विद्माम नगराध्यक्षांना सध्या एका गटाचा पाठिंबा असल्यामुळे राजीनामा सहजासहजी देण्यात येण्याची कमी शक्यता आहे. तर पालकमंत्री अशोक चव्हाण यांना ओहरटेक करण्याच्या तयारीत काॅग्रेसचा एक गट शहरात आहे. या गटबाजीत भाजप बाजी मारु शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दिड वर्षापूर्वी नगराध्यक्ष करण्यासाठी नकार..

नगरपंचायतीमध्ये काॅग्रेसची सत्ता आहे. काॅग्रेसच्या नगरसेवकांचा आलेख खाली येत असतांना गटबाजी काही संपत नाही. याचा फटका दिडवर्षापुर्वी  झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत मुसबीर खतीब यांना बसला. गेल्या दहा वर्षात ते ग्रामपंचायत व नगरपंचायत सदस्य होते. सध्या त्यांची पत्नी नगरसेवक असून त्या उच्च शिक्षित आहेत. नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलासाठी सुटले होते. काॅग्रेसचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून खतीब यांनी नगराध्यक्षपदासाठी आग्रह धरला होता. पण काॅग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी खतीब यांना डावलून सुमेरा बेगम शेख लायक यांना नगराध्यक्ष केले. नगराध्यक्षपदचा दिड वर्षांचा कालावधीत ब-यांच घटना झाल्या आहेत. ज्यांनी खतीब यांना नगराध्यक्ष करण्यासाठी विरोध केला होता. तेच नगरसेवक आता खतीब यांनी नगराध्यक्ष करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. दिडवर्षापुर्वी हुकलेली संधी खतीब यांना मिळणार काय हे येणारा काळच ठरवेल.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com