नांदेड : अशोक चव्हाणांमुळे मध्यवर्ती बँकेला उभारी; बाळासाहेब पाटील

बाळासाहेब पाटील रावणगावकर यांचे भोकरला प्रतिपादन
Nanded Central Bank Director Balasaheb Patil Ravangaonkar
Nanded Central Bank Director Balasaheb Patil Ravangaonkar

भोकर : तालुक्यातील १ हजार ७५ शेतकऱ्यांनी तब्बल ४ कोटी ७१ लाख रुपये कर्ज थकवले असून, सदरील कर्जाची रक्कम शेतकऱ्यांनी ऑगस्टपर्यंत भरणा करावी असे आव्हान करून अडचणीच्या काळात जिल्हा मध्यवर्ती बँकेस मुख्यमंत्री असतांना अशोक चव्हाण यांनी १२० कोटीची आर्थीक मदत केल्याने बँकेला उभारी मिळाली आहे. अशी माहिती बॅंकेचे संचालक बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी शनिवारी दिली आहे.

आर्थिक व डिजिटल साक्षरता अभियान अंतर्गत बॅंकेचे संचालक व तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटीचे पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली. या वेळी बॅंकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अजय कदम, संचालक प्रतिनिधी रामचंद्र मुसळे, तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन मारोती बल्लाळकर, नामदेवराव आयलवाड, सेवा सोसायटीचे चेअरमन किशोर पाटील लगळूदकर, बाबुराव गोपतवाड, नागोराव कोठूळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी रावणगावकर म्हणाले की, जिल्हा मध्यवती बँकेने दिलेले कर्ज सुरक्षित रहावे यासाठी तहसीलदार आणि संबंधित विभागाला कर्जदारांची माहिती देण्यात येणार असल्याचा महत्वाकांक्षी निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँके प्रमाणे आता जिल्हा बँकेच्या कर्जदारांना कर्जाची परतफेड केल्याशिवाय इतर कुठेही कर्ज घेता येणार नाही असे सांगितले. बैठकीला तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, सदस्य, बॅंकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com