esakal | नांदेड : हवेतील कार्बन कमी करुन हमखास उत्पादन देणाऱ्या बांबूची लागवड करावी- पाशा पटेल 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नांदेड येथे आलेले पाशा पटेल यांनी बुधवारी (ता. नऊ) माध्यम प्रतिनिधी संवाद साधला. ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांबू या विषयात पुढाकार घेतला आहे. आत्मनिर्भर भारताची उभारणी करताना बांबूचा सहभाग महत्त्वाचा असणार आहे.

नांदेड : हवेतील कार्बन कमी करुन हमखास उत्पादन देणाऱ्या बांबूची लागवड करावी- पाशा पटेल 

sakal_logo
By
कृष्णा जोमेगावकर, प्रल्हाद कांबळे

नांदेड : देशात तापमानवाढीची समस्या भयंकर वाढत असल्याने कार्बन उत्सर्जन कमी करून तापमान कमी करण्यात महत्त्वाचा भाग असलेल्या
बांबूचे उत्पादन शेतकऱ्यांनी केल्यास त्यांना हमखास उत्पादन मिळेल. यासाठी शेतकऱ्यांनी बांबूची लागवड करावी असे आवाहन शेतकरी नेते पाशा पटेल यांनी केले आहे.

नांदेड येथे आलेले पाशा पटेल यांनी बुधवारी (ता. नऊ) माध्यम प्रतिनिधी संवाद साधला. ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांबू या विषयात पुढाकार घेतला आहे. आत्मनिर्भर भारताची उभारणी करताना बांबूचा सहभाग महत्त्वाचा असणार आहे. देशाच्या विकास चळवळीत बांबू हा केंद्रबिंदू
ठरणार असल्यामुळे बांबू लागवडीमुळे जंगलतोड कमी होऊन पर्यावरण वाचवता येऊ शकते. बांबूच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे शक्य आहे. या सोबतच शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकते. 

हेही वाचा  नांदेड जिल्ह्यातील शेकऱ्यांनी एकत्रीत शेती करण्याची गरज : जिल्हाधिकारी डॉ. विपीन -

पर्यावरणात बदल होत असताना बांबूमुळे वनक्षेत्र वाढू शकते. याशिवाय बांबू लागवडीतून शेतकऱ्यांना उसापेक्षा अधिक उत्पादन मिळते असे ते म्हणाले. कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारे पीक शंभर वर्षापर्यंत खात्रीशीर उत्पन्न देऊ शकते. बांबू लागवड केली असता वर्षाकाठी एकरमध्ये किमान एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळणे शक्य आहे. बांबूपासून इथेनॉल, सीएनजी, कापड, फर्निचर, कागद, तांदूळ, बिस्किट, लोणची यासारखी विविध वस्तू तयार होतात. बांधकामांमध्ये लोखंडा सोबत १५ टक्के बांबू वापरण्यात राज्य शासनाने परवानगी दिली आहे. केंद्र सरकारने सीएनजीचे पाच हजार पंप देशात सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बांबू शेतकऱ्यांसाठी कल्पवृक्ष करणार आहे. शेतकऱ्याने बाबूच्या शेतीकडे वळले पाहिजे असे त्यांनी आवाहन केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी बांबू फर्निचर तयार करण्यासाठी केली आहे. चिचपल्ली (जि. चंद्रपूर) येथे बाबू रिसर्च सेंटरची शंभर कोटी रुपयांची इमारत बांबूपासुन तयार केली आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या घटकांना क्रियाशील घटकाचे जोडले जाणार आहे. वास्तुविशारद, अभियंता, निर्मितीकार, डिझायनर, प्रशिक्षण संस्था, संशोधन संस्था, वित्तीय संस्था, यंत्रसामुग्री निर्माते यांना परस्परांशी जोडून
साखळी निर्माण करण्याचे उद्दिष्ट असे पाशा पटेल म्हणाले.

loading image