esakal | नांदेड : प्रेरणादायी प्रशिक्षणाने ध्येयवादी बना- अंशुमन समल
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

भारतीय स्टेट बँकेच्या पुढाकाराने ग्रामीण स्वंय रोजगार प्रशिक्षण संस्था नांदेड द्वारे महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्वंय सहाय्यता महिला बचत गटासांठी ग्राम उमरी ता.अर्धापूर येथे प्रारंभ झालेल्या दहा दिवसीय दुग्ध व्यवसाय व गांडुळ खत निर्मिती प्रशिक्षणात ३५ महिलांनी सक्रीय सहभाग घेतला

नांदेड : प्रेरणादायी प्रशिक्षणाने ध्येयवादी बना- अंशुमन समल

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड - स्वंयरोजगार आणि कौशल्य विकास उपक्रमाच्या माध्यमातून आरसेटी अंतर्गत देण्यात येणारे महत्वकांक्षी व प्रेरणादायी प्रशिक्षण मोफत आत्मसात करतांना स्वावलंबनाच्या जिद्दीने स्वंयरोजगाराची पायाभरणी करा अन् ध्येय्यवादी बना, असा संदेश भारतीय स्टेट बँकेचे मुख्य प्रबंधक अंशुमन समल यांनी महिला बचत गटांना दिला.


भारतीय स्टेट बँकेच्या पुढाकाराने ग्रामीण स्वंय रोजगार प्रशिक्षण संस्था नांदेड द्वारे महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्वंय सहाय्यता महिला बचत गटासांठी ग्राम उमरी (ता.अर्धापूर) येथे प्रारंभ झालेल्या दहा दिवसीय दुग्ध व्यवसाय व गांडुळ खत निर्मिती प्रशिक्षणात ३५ महिलांनी सक्रीय सहभाग घेतला.


या प्रशिक्षण शिबिराच्या समारोप समारंभात भारतीय स्टेट बँकेचे मुख्य प्रबंधक अंशुमन समल यांनी महिला बचत गटाच्या सहभागाने साकारणाऱ्या स्वंयरोजगाराच्या विविध अभ्यासपूर्ण संकल्पना सादर केल्या. या माध्यमातून उन्नतीचे ध्येय्य गाठा, असे आवाहन देखील मुख्य व्यवस्थापक अंशुमन समल यांनी केले.

हेही वाचा नांदेड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही, गुरुवारी ३९ अहवाल पॉझिटिव्ह

यानिमित्ताने दुग्ध व्यवसाय संबंधी तसेच यक्तिमत्व, आर्थिक साक्षरता आणि उद्योजकता विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले. खेळ आणि क्षेत्र भेटी द्वारा प्रेरणा आणि आत्मविश्वास निर्माण करण्यात आला. प्रशिक्षण कालावधीमध्ये प्रशिक्षणाथ्र्यांची जेवणाची सुद्धा व्यवस्था मोफत करण्यात आली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. भारतीय स्टेट बँक आरसेटी नांदेड द्वारा अशा विविध निवासी आणि अनिवासी प्रशिक्षणाचे मोफत आयोजन करण्यात येते. ज्यामध्ये शिवणकाम, ब्युटी पार्लर, पापड आणि मसाला बनविणे, कागदी आणि कापडी बॅग बनविणे, शेळी संगोपन, कुक्कुटपालन, मोबाईल दुरुस्ती, दुचाकी वाहन दुरुस्ती, घरगुती उपकरण दुरुस्ती इत्यादी मोफत प्रशिक्षणाचा समावेश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


हे सर्व प्रशिक्षण ग्रामीण भागातील अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील बेरोजगार युवक- युवतींनी लाभदायक असल्याचे प्रतिपादन संचालक प्रदीप पाटील यांनी यावेळी केले.
उमरी (ता. अर्धापूर ) येथील या यशस्वी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपाला भारतीय स्टेट बँकचे मुख्य व्यवस्थापक अंशुमन समल, भारतीय स्टेट बँकेच्या अधिकारी शिल्पा जिंतूरकर, आरसेटी संचालक प्रदीप पाटील, पंचायत समिती अर्धापुर येथील तालुका व्यवस्थापक गजेंद्रसिंह चंदेल, प्रभाग समन्वयक विनोद लोहकरे, परीक्षक दिलीप शिरपूरकर, बी. डब्ल्यू. काळे, प्रशिक्षक आणि कार्यक्रम समन्वयक आशिष राऊत हे उपस्थित होते. या समारंभाच्या यशस्वीतेसाठी प्रशिक्षक आशिष राऊत, ग्रामसंघ अध्यक्षा ज्योती गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

loading image