esakal | नांदेडला वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड - धनेगाव येथे पथकाने कारवाई करत थर्माकॉल जप्त केले. 

यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प यंदा अनेकवेळा भरल्यामुळे गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. त्यामुळे गोदावरी नदीत वाहून आलेली वाळू उपसा करण्यासाठी पुन्हा एक वाळू माफिया सक्रीय झाले आहेत. दररोज कोणत्या ना कोणत्या मार्गाने अवैधरित्या वाळू उपसा करून तो वाहनाद्वारे नेण्यात येत आहे. त्यामुळे अशा वाळू माफियांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यानंतर नांदेड तहसील कार्यालयामार्फत कारवाई करण्यात येत आहे. 

नांदेडला वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - शहरातील गोदावरी नदीवर अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांविरूद्ध कारवाई करण्यास जिल्हा प्रशासनाने सुरूवात केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिलेल्या आदेशानुसार नांदेड तहसील कार्यालयाच्या पथकाकडून कारवाई करण्यास सुरूवात झाली आहे. 

यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प यंदा अनेकवेळा भरल्यामुळे गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. त्यामुळे गोदावरी नदीत वाहून आलेली वाळू उपसा करण्यासाठी पुन्हा एक वाळू माफिया सक्रीय झाले आहेत. दररोज कोणत्या ना कोणत्या मार्गाने अवैधरित्या वाळू उपसा करून तो वाहनाद्वारे नेण्यात येत आहे. त्यामुळे अशा वाळू माफियांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यानंतर नांदेड तहसील कार्यालयामार्फत कारवाई करण्यात येत आहे. 

हेही वाचा - विष्णुपूरीचे दोन दरवाजे उघडले, सावधानेतचा इशारा 

नायब तहसीलदारांवर केला होता हल्ला
दरम्यान, मागील आठवड्यात अवैधरित्या वाळू उपसा होत असल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार नांदेड तहसील कार्यालयाचे पथक गोदावरी नदीवर कारवाईसाठी गेले होते. मात्र, त्यावेळी नायब तहसीलदार मुगाजी काकडे यांच्यावर अवैध वाळू उपसा करणाऱ्यांनी हल्ला केला होता. या संदर्भात नांदेड ग्रामिण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

थर्माकॉलची विक्री करणाऱ्यांवर कारवाई
दरम्यान, वाळू उपसा करण्यासाठी थर्माकोलची विक्री करणाऱ्या नांदेड शहरालगत असलेल्या धनेगाव येथील माशा अल्ला कॉम्प्लेक्समधील मोहमंद सोहेल मोहमंद इस्माईल यांच्या दुकानावर रविवारी (ता. ११ आॅक्टोंबर) धाड टाकून अंदाजे अडीच लाख रुपयांचे थर्माकोल जप्त करून गोदाम सील करण्यात आले आहे.

 

हेही वाचलेच पाहिजे - हिंगोली : नवरात्रोत्सव जवळ आल्याने दूर्गा मुर्ती तयार करण्याचे काम अंतीम टप्प्यात

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश
जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, महापालिका, पोलीस व पंचायत समिती  यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करून सील केले आहे. सदरील कारवाई नांदेडचे उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार किरण आंबेकर, नायब तहसीलदार मुगाजी काकडे, मंडळ अधिकारी गजानन नांदेडकर, महापालिकेचे उपायुक्त शुभम क्यातमवार व त्यांचे कर्मचारी तसेच नांदेड पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी श्री. बच्चेवार, ग्रामसेवक श्री. सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. थोरात व त्यांचे कर्मचारी तलाठी राहुल चव्हाण, कोतवाल मुंडे, वाहनचालक जहीर भाई यांनी केली आहे

गुन्हे दाखल होणार
गोदावरी नदी तसेच इतर ठिकाणी काही वाळू माफिया अवैधरित्या व बेकायदेशिररित्या वाळू तसेच काही ठिकाणी मुरुमही उत्खनन होत आहे. याबाबत नांदेड तहसील कार्यालयातर्फे एक पथक गठित करण्यात आले आहे. यापुढे अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यावर त्याचबरोबर त्यांना सहकार्य करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. 
- किरण आंबेकर, तहसीलदार, नांदेड.

loading image