Nanded : बेटी बचाओ’ जण आंदोलन रॅली महाराष्ट्र आणि तेलंगणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nanded news

Nanded : बेटी बचाओ’ जण आंदोलन रॅली महाराष्ट्र आणि तेलंगणात

नांदेड : बेटी बचाओ जण आंदोलनामुळे मुलींचा जन्मदर वाढल्यामुळे व्याप्ती महाराष्ट्रासह तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थानसह इतरही राज्यात वाढविण्यात येणार असल्याचे बेटी बचाव जनआंदोलनाचे महाराष्ट्र आणि तेलंगणा समन्वयक डॉ. लक्ष्मीकांत कलमूर्गे यांनी सांगितले.

हेही वाचा: Nanded : माझी सालदारकी संपत आली ; हरिभाऊ बागडे

बेटी बचाओ जनआंदोलन रॅली आता महाराष्ट्र आणि तेलंगणात व्याप्ती वाढवण्यासाठी डॉ. गणेश राख, डॉ. लक्ष्मीकांत कलमूर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार तयारी सुरु आहे. लवकरच महाराष्ट्रातील बिलोली शहरात आणि तेलंगणातील बोधन शहरात भव्य बेटी बचाव रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. डॉ. गणेश यांचे पुणे येथे असलेल्या हॉस्पिटलमध्ये मुलगी जन्माला आल्यास मोफत प्रसूती करून एक जल्लोष साजरा करतात.

हेही वाचा: Nanded : शेतकऱ्यांनी जाग्यावर सोडली फुले

भारतातच नव्हे तर देश विदेशात पण मुलगी वाचवा अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या अभियानात दोन लाख डॉक्टर्स व पंधरा हजार सामाजिक संस्थे काम करत असल्याचेही डाॅ. लक्ष्मीकांत कलमूर्गे यांनी सांगितले. स्त्रीभ्रूणहत्येच्या वाढत्या समस्येला तोंड देण्यासाठी बेटी बचाओ जनआंदोलन हाती घेतलेल्या पुण्यातील डॉ. गणेश राख यांच्या कार्याची दखल घेत आफ्रिकेतील देशांनी डॉ. राख यांचा कित्ता गिरवण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा: Nanded : जिल्ह्यातील १९८२ गायवर्ग पशुधनाला लम्पीची बाधा

सन २०१२ पासून डॉ. गणेश राख यांनी वैयक्तिक पातळीवरून स्त्रीभ्रूणहत्येविरोधात काम करण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांच्या रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल झालेल्या गर्भवती महिलेने मुलीला जन्म दिला असता त्या मुलीचे स्वागत करण्यासाठी प्रसूतीचा संपूर्ण खर्च माफ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.