नांदेड : अर्धापुरात मनोरूग्ण मित्राचा मित्रांनी केला धुमधडाक्यात वाढदिवस साजरा, जिल्ह्यात ठरला चर्चेचा विषय

लक्ष्मीकांत मुळे
Monday, 23 November 2020

अर्धापूर येथील एका मनोरूग्णाचा वाढदिवस त्यांच्या मित्रांनी धुमधडाक्यात साजरा करून एक अपुलकी जपत मैत्रित सर्व समान असतात हा संदेश दिला आहे.वाढदिवसनिमित्ताने शुभेच्छा फलक, समाज मध्यमातून व्हीडीओ, शुभेच्छा संदेश दिले आहे.हा आगळा वेगळा वाढदिवस चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

अर्धापूर (जिल्हा नांदेड):  वाढदिवस प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाचा क्षण व घटना. हा दिवस धुमधडाक्यात व्हावे ही सर्वांची ईच्छा आसते..सिने तारका, नायक, मंत्री,अधिकारी ,पदाधिकारी आमदार , खासदार , यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते..हितचिंतकांची ,गर्दी, शुभेच्छांचा वर्षाव, बॅनरबाजी, सामामाध्यम, वर्तमान पत्रातून जाहिरात हे आपण नेहमीच अनुभवतो.. सामज माध्यम आल्यानंतर वाढदिवसानिमित्त होणारे कार्यक्रम वाढले आहेत.

अर्धापूर येथील एका मनोरूग्णाचा वाढदिवस त्यांच्या मित्रांनी धुमधडाक्यात साजरा करून एक अपुलकी जपत मैत्रित सर्व समान असतात हा संदेश दिला आहे.वाढदिवसनिमित्ताने शुभेच्छा फलक, समाज मध्यमातून व्हीडीओ, शुभेच्छा संदेश दिले आहे.हा आगळा वेगळा वाढदिवस चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. पहिल्यांदाच वाढदिवस साजरा होत आसल्यामुळे रविवारी (ता 22) सकाळ पासूनच शुभेच्छा देण्यास सुरूवात झाली ते रात्री उशिरा पर्यंत चालूच होते.रात्री केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या 

अर्धापूर शहरातील नवी अबादी भागात  आरएफ नावाचा एक तरुण मनोरूग्ण आहे.शहरातील विविध भागात , समारंभात फिरत आसतो.तसेच आजुबाजुच्या गावात देखील तो जातो. कोणत्याही मिरवणुकीत नाचून मनोरंजन करणे हा त्याचा आवडता छंद.तो जरी मनोरूग्ण आसला तरी कोणालाही त्रास देत नाही.खान्यासठी मदत मागतो.तो सर्वांना परिचित आहे.

नेते ,अभिनेते, आमदार ,खासदार मंत्री अधिकारी,पदाधिकारी  ,गावापासून ते दिल्ली पर्यंत वाढदिवस साजरे केले जातात तसेच हे वाढदिवस चर्चेचा विषय ठरतात.पण ऐखाद्या मनोरूग्णाच्या नशीबात असे आनंदाचे प्रसंग व्वचितच येतात.यांना कोणी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत नाहीत.वाढदिवस साजरा करणे तर दुरच.

हेही वाचा - दिवाळीत एसटीची कोटीची उड्डाणे, परभणी आगाराची १० दिवसात चार कोटीची कमाई -

आरएफ चा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय त्यांच्या जीवलग मित्रांनी घेतला.सगळा मित्रांनी तयारी सुरू केली.कोणी बॅनर्स तयार केले तर कोणी शुभेच्छा देणारे व्हीडीओ.तर कोणी आनला भला मोठा केक. आपल्या मित्राला नवीन कपडे ही घेतले.तसेच जेवनाची मेजवानी देण्यात आली.हा आगळा वेगळा वाढदिवस जिल्हात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.तसेच भावी नगरसेवक म्हणुन शुभेच्छा ही देण्यात आल्या.

समाज मध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्यामुळे चांगलीच चर्चा होत आहे.तसेच उठसूट वाढदिवस साजरा करून सार्वजनिक ठिकाणी अडथळे निर्माण करणे, फडाके फोडने ,बॅनर्स लावून शहराचे विद्रपीकरण करणे आशा महाभागाना चांगलीच चपराक बसल्याची चर्चा ही नागरिकांतून होत आहे.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Birthday celebrations of a mentally ill friend in Ardhapur, became a topic of discussion in the district nanded news