esakal | Nanded Breaking : आज पुन्हा तीन कोरोनाबाधित, संख्या गेली ३४ वर

बोलून बातमी शोधा

File photo

रविवार संध्याकाळपर्यंत एक हजार ३२९ संशयितांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी एक हजार २०८ व्यक्तिंचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. तर ५६ संशयितांचे अहवाल येणे अजून बाकी आहे.

Nanded Breaking : आज पुन्हा तीन कोरोनाबाधित, संख्या गेली ३४ वर
sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : जिल्ह्यात दरदिवसाला शंभर पेक्षा अधिक लोकांच्या घशातील लाळेचे स्वॅब घेण्यात येत आहेत. रविवारी (ता. तीन मे) गुरुद्वारा परीसरातील काही व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकीच तिघांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचे सोमवारी (ता. चार) दुपारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.  

रविवार संध्याकाळपर्यंत एक हजार ३२९ संशयितांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी एक हजार २०८ व्यक्तिंचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. तर ५६ संशयितांचे अहवाल येणे अजून बाकी आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी गुरुद्वारा परीसरातील २० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. मात्र यातील चार जण अद्यापही सापडले नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासन हतबल झाले असून, पन्नास तास उलटुन गेले तरी फरार चार कोरोना बाधितांचा पत्ता लागलेला नाही.  

हेही वाचा - नांदेडकर चिंताग्रस्त : ‘ते’ चार पॉझिटीव्ह रुग्ण बेपत्ताच

सोमवारी गुरुद्वारा परीसरातीलच तीन रुग्ण वाढल्याने जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ३४ वर गेली आहे. त्यातील तीघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीस कोरोनाची लागण झाली असली तरी, यातील दोघांना दमा, शुगर, उच्च रक्तदाब यासारखे गंभीर आजार होते. तर देगलुरनाका परीसरातील रविवारी मृत्यू झालेल्या एका महिलेवर कोरोना पूर्वीच खासगी रुग्णालयात ‘सारी’ आजारावर उपचार सुरु होते. 

हे देखील वाचाच - आनंदवार्ता : कोट्याहून परतलेल्या विद्यार्थ्यांचा अहवाल निगेटीव्ह
 
कोरोनाची लागण झालेल्या जवळपास २७ कोरोना बाधीत रुग्णावर विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय व शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्व कोरोना बाधीत रुग्णावर उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.