esakal | नांदेड : उमरीच्या एसबीआय बँकेत दलालांचा सुळसुळाट, पीक कर्ज देण्यास टाळाटाळ
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

उमरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तरीही शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप केले जात नाही. अगोदर पीक विम्याच्या नावाखाली मुद्दाम शेतकऱ्यांना बँकेत खेटे मारण्यास लावले.

नांदेड : उमरीच्या एसबीआय बँकेत दलालांचा सुळसुळाट, पीक कर्ज देण्यास टाळाटाळ

sakal_logo
By
प्रल्हाद हिवराळे

उमरी (जिल्हा नांदेड) : उमरी येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच बँक ऑफ बडोदा या राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये दलालांचा सुळसुळाट झाला असून खरीप हंगाम संपून आता रब्बी हंगाम सुरु झाला असतानाही शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही. या प्रकाराला कंटाळून शेतकऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

उमरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तरीही शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप केले जात नाही. अगोदर पीक विम्याच्या नावाखाली मुद्दाम शेतकऱ्यांना बँकेत खेटे मारण्यास लावले. आता कर्जमाफीमध्ये नाव आले नाही. मोबाईलमध्ये संदेश आला नाही. आमच्याकडे सध्या भरपूर फाईल पेंडिंग आहेत. असे विविध कारणे सांगून शाखा व्यवस्थापक आणि फिल्ड ऑफिसर व अनेक अधिकारी-कर्मचारी हे शेतकऱ्यांची हेटाळणी करीत आहेत. 

हेही वाचा परभणी : सेलूत चार जिल्हांतून कापसाची आवक - दोन लाख क्विंटल कापसाची खरेदी

तरीही अद्याप पावेतो राष्ट्रीयीकृत बँकांनी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी पीक कर्जाचे वाटप केलेले नाही. याबाबत लोकप्रतिनिधी तसेच बँकेचे वरिष्ठ काहीच बोलत नाहीत. शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार आहे. आतापर्यंत किती शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले, किती शेतकऱ्यांच्या फायली प्रलंबित आहेत याबाबत कसलीच माहिती अधिकार्‍याकडे मिळत नाही. सातत्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर शेतकर्‍यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image