
Nanded : वेड्या बहिणीची रे वेडी माया...भावाच्या मृत्यूने दु:खी झालेल्या बहिणीने माहेरी ठेवला प्राण
अर्धापूर : भाऊ बहिणीच्या नात्याला एक वेगळे स्थान आहे.पौराणिका काळापासून ते आजपर्यंत हे नाते टिकवून आहे.एकमेकांवर जीवापाड प्रेम करत एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होवून नाते निभावले जात.रक्षा बंधनाला बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी बंधु घतो.
ज्या भावा बरोबर खेळलो,बागडलो, कधी भांडलो,एकत्र मुळाक्षरे बाराखडी गिरवली तोंच भाऊ आज आपणाला सोडून गेला.हे दुःख सहन न झाल्याने भावाच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या बहिणीने माहेरीच आखेरचा श्वास घेतला.ही हृदयद्रावक घटना शहरातील अहिल्यादेवी नगरातील साखरे कुटूंबात बुधवारी (ता १५) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
शहरातील अहिल्यादेवी नगरातील ज्येष्ठ नागरिक नामदेव यादोजी साखरे (वय ८५) हे गेल्या काही वर्षांपासून आजारी होते.त्यांचा आजार बळावल्याने प्रकृती अधिकच खालावली होती. त्यांचा राहत्या घरी मंगळवारी (ता १४) रात्री निधन झाले.हि निधनाची बातमी त्यांच्या बहिणीसह सर्व नातेवाईकांना देण्यात आली.
नामदेव साखरे यांच्या पार्थिवावर बुधवारी (ता १५) अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने त्यांचे नातेवाईक अंत्यदर्शनासाठी जमु लागले.आपल्या लाडक्या भावाच्या अंत्यदर्शनासाठी मथुराबाई संभाजी बोरकर (वय ८० या कोर्टा ता वसमत जिल्हा हिंगोली) सकाळी नऊ वाजण्याच्या आल्या.
भावाचा मृतदेह पाहताच धक्का बसला व काही क्षमताच प्राण सोडला.उपस्थित नातेवाईकांनी तातडीने उपचारासाठी शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वैद्यकीय तपासणी करून मृत घोषित केले. त्यानंतर त्यांची साडीचोळीने बोळवण करून अंत्यसंस्कारासाठी कोर्टा येथे पार्थिव देह पाठविण्यात आला.त्यांच्या पश्चात पती, तीन मुली,एक मुलगा असा परिवार आहे. तर नामदेव साखरे यांच्या मागे पत्नी, पांच मुली, दोन मुलगे असा परिवार आहे.
एकुलती एक लाडकी बहिण.
मयत नामदेव साखरे यांना दोन भाऊ व एक बहिण.तीन भावात एक लाडकी बहिण असल्याने मथुराबाई यांचा आदर, सन्मान केला जात असे. नामदेव साखरे हे आजारी आसल्याने त्यांची बहीण काही दिवसांपूर्वी भेटुन गेल्या होत्या.
तसेच आरोग्याची काळजी घे असे सांगून गेल्या.ही शेवटचीच भेट होईल त्यांना ठाऊक नव्हते.नियतीच्या मनात काही वेगळेच होते. या भावंडातील दोन भाऊ वारल्यानंतर हे भाऊ बहिण एकमेकांना आधार होते.पण सर्व भावंडात वडील आसलेले नामदेव साखरे आपणाला सोडून गेले आहेत या दुःख सहन न झाल्याने जीवाच्या सोबत व जीवनाच्या नंतरही पवित्र नाते जोपासता आपली जीवनयात्रा संपवली. यालाच म्हणतात वेड्या बहिणीची वेडी रे माया...