नांदेडच्या बसस्थानक स्थलांतरासाठी हालचालीला वेग; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

शहराचे झालेले विस्तारीकरण आणि वाढलेली लोकसंख्या यामुळे बसस्थानक हे प्रवाशांसाठी गैरसोयीचे ठरत आहे
nanded
nandednanded
Summary

शहराचे झालेले विस्तारीकरण आणि वाढलेली लोकसंख्या यामुळे बसस्थानक हे प्रवाशांसाठी गैरसोयीचे ठरत आहे

नांदेड: शहरात वाहतुकीसाठी अडथळा ठरणाऱ्या मध्यवर्ती बसस्थानक हे इतरत्र स्थलांतर करण्यासाठी प्रशासकीय स्तरावरून हालचाल सुरु झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार किरण अंबेकर यांनी जागेची चाचपणी केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सोमवारी (ता.नऊ) बैठक घेवून आढावा घेतला आहे.

नांदेड शहराच्या मध्यभागी असलेल्या मध्यवर्ती बस्थानक हे वाहतूकीसाठी नेहमीच डोकेदुखी बनली आहे. शहराचे झालेले विस्तारीकरण आणि वाढलेली लोकसंख्या यामुळे बसस्थानक हे प्रवाशांसाठी गैरसोयीचे ठरत आहे. मध्यवर्ती बसस्थानक स्थलांतर करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरु झाल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या सूचनेनुसार तहसीलदार किरण अंबेकर यांनी देगलूर नाका, कौठा, कापूस संशोधन केंद्र येथील जागेची पाहणी करून चाचपणी केली आहे.

nanded
खूशखबर! औरंगाबाद महापालिकेत लवकरच होणार नोकरभरती

जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सोमवारी या संदर्भात बैठक घेतली असून सविस्तर आराखडा परिपूर्ण आराखड्याच्या अनुषंगाने बैठक घेवून चर्चा केली. बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक, कार्यकारी अभियंता व इतर अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com