
शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती, दंडाधिकारी शक्ती प्रदान केलेले अधिकारी, पोलीस अधिकारी- कर्मचारी, बँकेच्या सुरक्षाव्यवस्थेवरील अधिकारी व महाराष्ट्र शासन गृह विभागाचे ता. २० सप्टेंबर २०१४ च्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्ह्यातील छाननी समितीने वगळलेल्या शस्त्र परवानाधारका व्यतिरीक्त इतर सर्व परवानाधारक व्यक्तींना परवाना दिलेली शस्त्रास्त्रे वाहुन नेण्यावर बंदी घातली आहे.
नांदेड : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात शस्त्रास्त्रे वाहून नेण्यावर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम १४४ अन्वये बंदी घातली आहे.
शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती, दंडाधिकारी शक्ती प्रदान केलेले अधिकारी, पोलीस अधिकारी- कर्मचारी, बँकेच्या सुरक्षाव्यवस्थेवरील अधिकारी व महाराष्ट्र शासन गृह विभागाचे ता. २० सप्टेंबर २०१४ च्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्ह्यातील छाननी समितीने वगळलेल्या शस्त्र परवानाधारका व्यतिरीक्त इतर सर्व परवानाधारक व्यक्तींना परवाना दिलेली शस्त्रास्त्रे वाहुन नेण्यावर बंदी घातली आहे. हा आदेश नांदेड जिल्ह्यासाठी ता. ११ नोव्हेंबर ते ता. तीन डिसेंबर २०२० पर्यंत लागू राहील.
हेही वाचा - शिक्षकांना दिलासा : अर्धापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे घरभाडे कपात करण्यास स्थगिती
शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे बी. एड परीक्षेत घवघवीत यश
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या बी. एड. २०२० उन्हाळी परीक्षेचा निकाल नुकताच लागला झाला आहे. येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाने घवघवीत यश मिळविलेले असून शासकीय अध्यापक महाविद्यालयाने याही वर्षी यशाची परंपरा कायम राखत ९३ टक्के प्रशिक्षणार्थी पास झाले आहेत.
या महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक बी. एड २०१९- २०२० चा निकाल लागला असून १०० टक्के प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी उत्तीर्ण होण्याचे श्रेय प्राचार्या व सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिले आहे. तसेच प्राचार्य डॉ. सुनंदा रोडगे यांनी सर्व प्राध्यापकांचे व प्रशिक्षणार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे. सर्व उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांचे अभिनंदन प्राचार्य डॉ. सुनंदा रोडगे, डॉ. सय्यद शाकेर, डॉ. उमेश मुरुमकर, डॉ. विठ्ठल घोनशेटवाड, श्री. गच्चे व विद्यापीठ विभाग श्री. सोनाळे, श्रीमती अनिता होळकर व सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.