नांदेड - मुख्यमंत्री ठाकरे यांना आरोग्य विभागातील रिक्तपदे भरण्यासाठी साकडे

शिवचरण वावळे
Thursday, 17 September 2020

कोरोना काळात तरी सरकारने पोलिस भरतीच्या धर्तीवर आरोग्य विभागातील रिक्त जागा भराव्यात अशी मागणी साने गुरूजी रूग्णालय, किनवटचे वैद्यकीय संचालक डॉ. अशोक बेलखोडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नांदेड - राज्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. आरोग्य सेवेच्या मर्यादा सुस्पष्टपणे जाणवू लागल्या आहेत. महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्‍य मंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री दोघेही तरूण अनुभवी व कार्यक्षम असले तरी, सर्व काही सुरळित चालले असल्याचा दावा केला जात असला तरी, वास्तव व मर्यादा मात्र उघडे पडत आहे.

आरोग्य सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्या तरी, हवे त्या प्रमाणात मनुष्यबळाची उपलब्धता नाही. म्हणून कोरोना काळात तरी सरकारने पोलिस भरतीच्या धर्तीवर आरोग्य विभागातील रिक्त जागा भराव्यात अशी मागणी साने गुरूजी रूग्णालय, किनवटचे वैद्यकीय संचालक डॉ. अशोक बेलखोडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

हेही वाचा- Video- मराठा समाजाने वकील लावावा, पैसे आम्ही देऊ : कोण म्हणाले? वाचाच ​

१७ हजारांवर पदे रिक्त भरा

निवेदनात डॉ. बेलखोडे म्हणाले, तुटपुंजे मनुष्यबळ असल्याने रूग्णालयात अस्वच्छता दिसून येते. जिल्हा आरोग्य अधिकारी संघटना प्रदेशाध्यक्ष यांनी जाहीर केलेली आकडेवारी ही सर्वांची झोप उडविणारी आहे. १७ हजारांवर पदे रिक्त असतील तर कोरोनाची लढाई कोणाच्या भरवश्यावर लढायची हा प्रश्नच आहे. सामान्य जनता राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सरकारकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. म्हणुन जंबो पोलिस भरतीच्या धर्तीवर आरोग्य खात्यातीलही भरती ताबडतोब करणे अनिवार्य आहे.

हेही वाचा- तळहातावरचे पोट भरायचे कसे, वेठ बिगारी कामगाराचा संतप्त सवाल ​

मुख्यमंत्री यांच्याकडे ऑनलाइन मागणी

ही भरती कोविड केंद्रासाठी ‘तात्पुरत्या स्वरूपाची’ म्हणुन भरती सारखी नसावी, कायमस्वरूपी पदे भरली गेल्यास अधिकारी व कर्मचारी हिरीरीने काम करतील व परिस्थिती सुरळित होण्यास मदत होईल असा विश्‍वास डॉ. अशोक बेलखोडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ऑनलाइन सादर केलेल्या निवेदनात आशावाद व्यक्त केला आहे. आरोग्य खात्यातील परिचरांसारखी पदे ही उच्चशिक्षीत उमेदवारांनी भरती न करता कमी शिकलेल्या (शैक्षणिक अर्हतेप्रमाणे) उमेदवारांमधूनच भरल्या जाव्यात. प्रभारींची अडकाठी दूर करून प्रामाणिकपणे पदोन्नत्या करणे क्रमप्राप्त आहे. शासनाने आरोग्य खात्यातील या रिक्त जागा भरल्या तरी मनुष्यबळाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर मार्गी लागेल यात शंका नाही. हे आतापर्यंत होऊ शकले नाही. मागील सरकारने पन्नास टक्के जागांवर भागवा असा अलिखीत नियम काढुन वेळ मारून नेली होती व निवडणूकीच्या तोंडावर महाभरतीच्या नावाखाली घोषणा करून जनतेला आमिष दाखविले होते.

जनतेची मरणप्राय भीतीतून सुटका करावी
आघाडी सरकार कृतीशील आहे. असा जनतेचा समज आहे. शासनाकडुन खुप मोठ्या अपेक्षाहा आहेत. कोरोना महामारीमुळे आरोग्य क्षेत्रात जागा भरणे गरजेचे आहे. कालच्या गृह खात्यामार्फत जंबो पोलिस भरतीच्या धर्तीवर आरोग्य खात्यातील भरतीचा निर्णय येत्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घ्यावा व महाराष्ट्रातील जनतेची मरणप्राय भीतीतून सुटका करावी
डॉ. अशोक बेलखोडे (संचालक साने गुरूजी रूग्णालय किनवटचे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NANDED: Chief Minister Thackeray has been asked to fill vacancies in the health department Nanded News