नांदेड शहरातील वाहतुक सुरू, सिग्नल बंद 

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 3 जून 2020

वाहतुक शाखेच्या कर्मचाऱ्यांवर नाहक वाहतुक सुरळीत करण्याचा ताण येत आहे. वाहतुकीसोबतच सिग्नल व सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावेत जेणेकरून बेभान वाहणाऱ्या वाहनावर नियंत्रण मिळवून भविष्यात होणाऱ्या अपघाताला रोखता येणार आहे

नांदेड : लॉकडाऊनच्या पाचव्या टप्‍प्यात शहरातील सर्वच वाहतुक (जड, ॲटोरिक्षा, चारचाकी व दुचाकी) सुरू करण्यात आली आहे. मात्र या वाहतुकीला स्पीड ब्रेक लावण्यासाठी महापालिकेच्या वतीने मुख्य चौकात लावण्यात आलेले सिग्नल बंद आहेत. त्यामुळे वाहतुक शाखेच्या कर्मचाऱ्यांवर नाहक वाहतुक सुरळीत करण्याचा ताण येत आहे. वाहतुकीसोबतच सिग्नल व सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावेत जेणेकरून बेभान वाहणाऱ्या वाहनावर नियंत्रण मिळवून भविष्यात होणाऱ्या अपघाताला रोखता येणार आहे. 

नांदेड शहराची रचना ही मुख्य एका रस्त्याच्या आजूबाजूने आहे. तरोडा नाका ते बर्की चौक हा एकमेव रस्ता आहे. की जो नांदेड दक्षिण व नांदेड उत्तर या भागाला जोडणारा आहे. या रस्त्याला शहराची धमनी म्हंटले तर वावगे ठरणार नाही. कारण शहरात येणारा प्रत्येक वाहनधारक या रस्त्यावर येतोच. यामुळे नेहमी या रस्त्यावर वाहतुकीचा बोजवारा उडतो. संपूर्ण शहर व वाघाळा महानगरपालिका क्षेत्र हे शहर वाहतुक शाखेच्या कामकाजाचे क्षेत्र आहे.

हेही वाचा -  पॉझिटिव्ह न्यूज - सहा महिन्याच्या चिमुकलीने कोरोनाला हरवले...

उद्योगांना सवलत दिल्याने आपसुकच वाहतुक सरू

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संबंध जगात लॉकडाउन सुरू आहे. भारतातही पाचव्या लॉकडाउनची घोषणा झाली. यामुळे सर्वच व्यवहार ठप्प होते. वाहतुक थांबविण्यात आली होती. मात्र माहाराष्‍ट्र शासनाने हळूहळू या लॉकडाउनमध्ये सुट देत काही प्रमाणात दुकाने व आदी व्यवहार सुरू केले. त्यातच अत्यावश्‍यक सेवा देणारी वाहने यापूर्वीच सुरू होती. परंतु पाचव्या लॉकडाउनमध्ये कन्टेनमेन्ट झोन वगळता शहरात सर्वत्र वाहतुक सुरू करण्यात आली. त्यामुळे सर्वच नागरिक आता रस्त्यावर उतरले आहेत. खरे तर लॉकडाउन सुरू असतांना वाहने व नागरिक रस्त्यावर येऊ नये असे संकेत असतांना व्यापार, उद्योगांना सवलत दिल्याने आपसुकच वाहतुक सरू करण्यात आली. 

चौकातील सिग्नल सेवा वाहतुक नियंत्रणात आणते

नांदेड शहराच्या रस्त्याची रुंदी कमी असल्याने फक्त या रस्त्यावरून एकेरी वाहतुक चालते. मुख्य रस्त्यावर वाहनांची गर्दी होताच वाहतुकीचा बट्याबोळ होत असतो. अशा वेळी वाहुतक शाखेला कसरत करावी लागते. नांदेड शहर सुरू झाल्याने वाहतुकही सुरू करण्यात आली आहे. काही चौकात वाहतुक कर्मचारी आपले कर्तव्य बजावतो. मात्र अनेक चौक असे आहेत की त्या ठिकाणी कर्मचारी नसतो. असा चौकात सिग्नल सेवा वाहतुक नियंत्रणात आणते. वाहुतक सुरू झाली मात्र रस्त्यावरील सिग्नल सेवा बंद असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुसाट वेगाने धावणाऱ्या या वाहनांना आळा घालण्यासाठी सिग्नल व्यवस्था सुरू करावी जेणे करून अपघात होणार नाहीत. 

येथे क्लिक करा - रामतिर्थच्या ‘या’ प्रकरणात मोक्का लावणार- एसपी मगर

शहर वाहतुक शाखेच्या पोलिसांवर ताण

शहरातील वाहतुक सुरळीत करण्यासाठी शहर वाहतुक शाखेत मनुष्यबळ कमी आहे. आहे त्या कर्मचाऱ्यांवर वाहतुक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लॉकडाउनमध्ये शहराचा सर्व व्यवहार सुरू झाला असल्याने वाहतुक सुरू झाली आहे. वाहतुकीची कोंडी होउ नये म्हणून प्रत्येक चौकात आमचा कर्मचारी तैणात करण्यात आला आहे. महापालिकेने सिग्नल जर सुरू केले तर विस्कळीत होणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण मिळविता येते. 
चंद्रशेखर कदम- पोलिस निरीक्षक, शहर वाहतुक शाखा, नांदेड. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded City traffic on, signal off nanded news