esakal | नांदेड :169 कोरोना बाधीत रुग्णांची प्रकृती गंभीर
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

दोन दिवसापासून पुन्हा कोरोना बाधित रुग्ण व मृत्यूची संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले. कोरोनाबाधित रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, बाधित रुग्ण संख्येत घट होताना दिसत नाही. 

नांदेड :169 कोरोना बाधीत रुग्णांची प्रकृती गंभीर

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : बुधवारी (ता. १२) ६१० अहवाल प्राप्त झाले असून त्यात ४९१ निगेटिव्ह तर ९९ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या तीन हजार ६१७ वर पोहचली. बुधवारच्या अहवालानुसार जिल्ह्यात उपचार सुरु असलेल्या कोरोना बाधित रुग्णांपैकी १६९ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. 

सोमवारी (ता. दहा) जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत काहीअंशी घट झाली होती. तसेच जिल्हाभरात एकही रुग्ण दगावला नव्हता. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या कमी व मृत्यूदर घटण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, दोन दिवसापासून पुन्हा कोरोना बाधित रुग्ण व मृत्यूची संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले. कोरोनाबाधित रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, बाधित रुग्ण संख्येत घट होताना दिसत नाही. 

हेही वाचा- देशभरातील १५ संशोधकांच्या यादीत नांदेडच्या शिवराज नाईकची निवड; या आजारावर केले महत्वपूर्ण संशोधन​

बुधवारी तिघांचा मृत्यू

मंगळवारी करण्यात आलेल्या आरटीपीसीआर व अँन्टीजेन तपासणीतून ९९ रुग्ण आढळले. दुसरीकडे १४७ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आत्तापर्यंत दोन हजार ५६ रुग्ण उपचारातून कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. दुसरीकडे देगलुरनाका येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एक पुरुष (वय ७५) व विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या दोन महिला (वय ६०) आणि (वय ५०) यांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १२९ इतकी झाली आहे. 

हेही वाचा- नांदेडमधील कोरोना योद्धांची व्यथा तुम्ही वाचाच...

१४७ रुग्णांची कोरोनावर मात

बुधवारी पंजाब भवन कोविड सेंटरला ६९, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात दोन, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयात १४, नायगाव कोविड केअर सेंटरला नऊ, देगलुर कोविड केअर सेंटरला ११, खासगी रुग्णालयात आठ, बिलोली कोविड केअर सेंटरला चार, भोकर कोविड केअर सेंटरला एक, हदगाव कोविड केअर सेंटरला दहा, मुखेड कोविड केअर सेंटरला १७, किनवट कोविड केअर सेंटरला एक, औरंगाबाद कोविड केअर सेंटरला एक असे १४७ बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. 

बुधवारी तालुकानिहाय  रुग्ण ​ संख्या
नांदेड महापालिका १८ 
लोहा  एक 
नायगाव  आठ 
बिलोली  एक 
कंधार  एक 
मुखेड  २४ 
भोकर तीन 
मुदखेड  ११ 
धर्माबाद  सात 
नांदेड ग्रामीण  सात 
उमरी  तीन
हदगाव  पाच 
देगलूर  आठ 
यवतमाळ  एक 
दिल्ली  एक 
एकुण  ९९ 


नांदेड कोरोना मीटर 

एकूण घेतलेले स्वॅब - २४ हजार ८६७ 
एकूण निगेटिव्ह स्वॅब - १९ हजार १३ 
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - तीन हजार ६१७ 
आज बुधवारी पॉझिटिव्ह रुग्ण - ९९ 
एकूण मृत्यू - १२९ 
आज बुधवारी मृत्यू - तीन 
एकूण रुग्णालयातून सुटी दिलेले रुग्ण - दोन हजार ५६ 
आज बुधवारी सुटी दिलेले रुग्ण - १४७ 
सध्या रुग्णालयात उपचार सुरु असलेले रुग्ण - एक हजार ४१४ 
आज बुधवारी प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या - ७४१ 
आज बुधवारी गंभीर प्रकृती असलेले रुग्ण - १६९