esakal | नांदेड कोरोना ब्रेकिंग : सोमवारी ५१ बाधितांची भर, तर तिघांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आजच्या एकूण ३३२ अहवालापैकी २२३ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता ९८६ एवढी झाली आहे. यातील ५१५ एवढे बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे

नांदेड कोरोना ब्रेकिंग : सोमवारी ५१ बाधितांची भर, तर तिघांचा मृत्यू

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात सोमवार (ता. २०) जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या अहवालानुसार आज ५१ व्यक्ती बाधित झाले. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ३३ तर अँटीजेन टेस्ट किट तपासणीद्वारे १८ बाधित आहेत. जिल्ह्यातील आज १५ व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. हिंगोली नाका, नांदेड येथील ६४ वर्षाची महिलेचा, नायगाव येथील २६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.  तसेच देगलुर नाका परिसरातील ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. सदर बाधितास शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड रुग्णालयात उपचार सुरु होते. या बाधितास उच्च रक्तदाब, मधुमेह व श्वसनाचे आजार होते. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या ४९ एवढी झाली आहे. यात ४२ मृत्यू हे नांदेड जिल्ह्यातील असून उर्वरीत सात मृत्यू हे इतर जिल्ह्यातील आहेत. आजच्या एकूण ३३२ अहवालापैकी २२३ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता ९८६ एवढी झाली आहे. यातील ५१५ एवढे बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आज रोजी ४२३ बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील ३१ बाधितांची संख्या गंभीर स्वरुपाची आहे. यात १७ महिला व १४ पुरुषांचा समावेश आहे.

आज बरे झालेल्या 24 बाधितांमध्ये मुखेड कोविड केअर सेंटर येथील एक, डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील चार, बिलोली दोन, पंजाब कोविड केअर सेंटर येथील पाच, औरंगाबाद संदर्भीत दोन, खासगी रुग्णालयातील एक बाधितांचा यात समावेश आहे.

हेही वाचानांदेड : संचारबंदीमध्ये तीन दिवसाची वाढ, नागरिकांनी सहकार्य करावे- प्रशासन

या परिसरातील आहेत बाधीत रुग्ण

नवीन बाधितांमध्ये कासराळी ता. बिलोली दोन, समतानगर मुखेड तीन, शारदानगर देगलूर एक, मोंढा मार्केट यार्ड लोहा एक, सिध्दार्थनगर नायगाव एक, कोलंबी ता. नायगाव एक, विजय सुलेमान टेकडी कंधार एक, शिवाजीनगर मुखेड दोन, मुक्रमाबाद ता. मुखेड सहा, बामणी ता. मुखेड एक, भोकरदन जिल्हा जालना एक, गोकुळनगर चार, खालसा काॅलनी एक, साईनगर एक, पाठकगल्ली सहा, देगलूर नाका एक, खाजाबाबानगर एक, शिवाजीनगर  मुखेड एक, जीएमसी विष्णुपूरी चार, छत्रपतीनगर नांदेड एक, जुना मोंढा  नांदेड एक, वजिराबाद एक, शहिदपूरा एक, हिंगोली नााका एक, जुना कौठा एक, वजिराबाद एक, तरोडा नाका एक, गणेशनगर एक, लातूर फाटा एक आणि शिवाजीनगर दोन असे एकुण नवीन बाधित हे ५१ आहेत.

येथे आहेत बाधितांवर उपचार सुरु

जिल्ह्यात ४२३ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. त्यांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे ८८, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे १५३, नायगाव कोविड केअर सेंटर येथे १२, जिल्हा रुग्णालय येथे २४, बिलोली कोविड केअर सेंटर येथे १२, मुदखेड कोविड    केअर सेंटर येथे ५, मुखेड कोविड केअर सेंटर येथे ३३, हदगाव कोविड केअर सेंटर येथे १, देगलूर कोविड केअर सेंटर येथे १७, माहूर कोविड केअर   सेंटर १, गोकुंदा कोविड केअर सेंटर येथे ३, लोहा कोविड केअर सेंटर येथे ११, कंधार कोविड केअर सेंटर येथे २, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे ३, खाजगी रुग्णालयात ५१ बाधित व्यक्ती उपचार घेत असून औरंगाबाद येथे संदर्भित पाच तर निझामाबाद एक आहेत. 

जिल्ह्यातील कोरोनाचे आकडे बोलतात


सर्वेक्षण- १ लाख ४८ हजार २५६
घेतलेले स्वॅब- १० हजार ३२४,
निगेटिव्ह स्वॅब- ८ हजार ४९८,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या-५१
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- ९८६,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- ५,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-५२,
मृत्यू संख्या- ४९,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- ५१५,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- ४२३,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- ९८.  

येथे क्लिक करालेंडी प्रकल्पाचे खरे जनक देवेंद्र फडणवीस- कोण म्हणाले वाचा...?

अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये

प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे