नांदेडला कोरोनाचा नवा उच्चांक; बुधवारी तब्बल ४०८ पॉझिटिव्ह  दिवसभरात २४६ कोरोनामुक्त; चार जणांचा मृत्यू 

शिवचरण वावळे
Wednesday, 9 September 2020

बुधवारी (ता. नऊ) आतापर्यंत सर्वात जास्त ४०८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, २४६ रुग्ण कोरोनातून मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली

नांदेड - कोरोनाबाधितांचे रोज नवे आकडे समोर येत आहेत. बुधवारी (ता. नऊ) आतापर्यंत सर्वात जास्त ४०८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, २४६ रुग्ण कोरोनातून मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. 

जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय, कोविड सेंटर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी भरुन गेले आहेत. मंगळवारी (ता. आठ) घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी बुधवारी (ता.नऊ) एक हजार ४६१ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ९९० निगेटिव्ह आले तर ४०८ जण पॉझिटिव्ह आढळून आले. विशेष म्हणजे यात कारागृहातील ८० कैद्यांना देखील समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात नऊ हजार ९८६ रुग्णसंख्या झाली आहे. 

हेही वाचा- राहाटीचा (ता.नांदेड) लोकसेवक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात ​

सहा हजार ३६६ रुग्ण कोरोनामुक्त 

श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात नऊ, पंजाब भवन कोविड सेंटरला १३३, मुखेडला १५, देगलूरला दहा, कंधारला तीन, धर्माबादला दहा, नायगावला ११, मुदखेडला ११, किनवटला सहा, माहूरला एक, हदगावला ११, लोहा कोविड सेंटरला २२ यासह खासगी रुग्णालयातील दहा रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत सहा हजार ३६६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 

३९ रुग्णांची प्रकृती गंभीर 

बुधवारी २४ तासात नांदेडला किशोरनगर महिला (वय ५२), विजयगड कंधार पुरुष (वय ६५), वाडी (बुद्रुक) नांदेड महिला (वय ४८) आणि गणेशनगर नांदेड महिला (वय ७२) या चार रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत २८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या तीन हजार २८३ कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरु असून, त्यापैकी ३९ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. ५२३ संशयितांच्या स्वॅबचा अहवाल येणे बाकी आहे. 

हेही वाचा-  नांदेड - घरांची मागणी वाढण्याला लॉकडाउन कारणीभूत, कसे ते वाचा...

इथे सुरु आहेत उपचार

उपचार सुरु असलेल्यापैकी शासकीय रुग्णालयात २७६, एनआरआय पंजाब भवन व महसूल भवन येथे एक हजार ५२ बाधितांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात ९२, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय ५१, नायगाव १३२, बिलोली १००, मुखेड १४३, देगलूर ५०, लोहा ११७, हदगाव १४३, भोकर १५, कंधार ५२, किनवट १२८, अर्धापूर ३९, मुदखेड ५०, माहूर ५१, धर्माबाद ४५, उमरी ५६, हिमायतनगर १३, बारड पाच, खासगी रुग्णालय ३३४, औरंगाबाद येथे संदर्भित सात, निजामाबाद दोन, मुंबई एक, हैदराबाद चार आणि लातूर येथे एक रुग्ण संदर्भित करण्यात आला आहे. 

बुधवारी बाधित रुग्णसंख्या

मंगळवारी आरटीपीसीआर व अँन्टीजन टेस्ट किटच्याद्वारे तपासणी करण्यात आली होती. यात नांदेड महापालिका हद्दीत १६१, नांदेड ग्रामीण २१, अर्धापूरला सहा, देगलूरला चार, हिमायतनगरला नऊ, किनवटला १३, लोह्यात २३, उमरीत २०, बिलोलीत १४, नायगावला ५४, मुखेडला ३२, धर्माबादला दोन, भोकरला आठ, हदगावला तीन, कंधारला तीन, मुदखेडला २९, माहूरला सहा, परभणीत एक, बीड एक, लातूर एक असे ४०८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

नांदेड कोरोना मीटर 

बुधवारी पॉझिटिव्ह - ४०८ 
बुधवारी कोरोनामुक्त - २४६ 
बुधवारी मृत्यू - चार 
एकुण बाधीत रुग्ण- नऊ हजार ९८६ 
आतापर्यंत बरे झालेले रुग्ण - सहा हजार ६३६ 
आतापर्यंत मृत्यू - २८० 
सध्या उपचार सुरु - तीन हजार २८३ 
सध्या गंभीर रुग्ण - ३९ 
अहवाल बाकी - ५२३ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded to Corona's new high; 248 corona free in 408 positive days on Wednesday; Four people died Nanded News