esakal | Corona Updates : नांदेडकरांना दिलासा! केवळ दोघेच कोरोनाबाधित
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

Corona Updates : नांदेडकरांना दिलासा! केवळ दोघेच कोरोनाबाधित

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व संशयीत व्यक्तींची चाचणी संख्या कमी झाली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या देखील कमी आढळून येत तर नाही ना? असा प्रश्‍न निर्माण होत आहे. गुरुवारी (ता. नऊ) प्राप्त झालेल्या ७०५ अहवालांपैकी केवळ दोन व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२ टक्क्यांवर आले आहे. जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या ९० हजार २७३ एवढी झाली असून यातील ८७ हजार ५८८ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आजघडीला जिल्हाभरात ३४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी चार बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. गुरुवारी दिवसभरात एकाही गंभीर रुग्णाचा मृत्यू झाला नाही. (Nanded Covid Updates)

हेही वाचा: चिमुरडी खेळता-खेळता पडली शेततळ्यात,आई गेली वाचवायला पण...

त्यामुळे जिल्ह्यात एकुण बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६५१ एवढी स्थिर आहे. गुरुवारी उमरखेड - एक, लोहा (Loha) - एक असे एकुण दोन बाधित आढळले. गुरुवारी दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दोन व्यक्तीला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. गुरुवारी ३४ कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी - नऊ, नांदेड महापालिका अंतर्गत गृह विलगीकरण -१६, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण - पाच, खासगी रुग्णालयात चार व्यक्तींवर उपचार सुरु आहेत.

नांदेड कोरोना मीटर

एकुण बाधित - ९० हजार २७३

एकूण बरे - ८७ हजार ५८८

एकुण मृत्यू -दोन हजार ६५१

गुरुवारी बाधित - दोन

गुरुवारी बरे - दोन

गुरुवारी मृत्यू- शुन्य

उपचार सुरु -३४

अतिगंभीर प्रकृती -चार

loading image
go to top