esakal | नांदेड सलग तिसऱ्या दिवशी त्रिशतकपार, शनिवारी ३७० जण पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

शनिवारी (ता.पाच) एक हजार ६२५ अहवालापैकी १ हजार २२३ निगेटिव्ह तर ३७० स्वॅबचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर दहा दिवसांच्या औषधोपचारानंतर २४२ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. 

नांदेड सलग तिसऱ्या दिवशी त्रिशतकपार, शनिवारी ३७० जण पॉझिटिव्ह

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - आजच्या वीस दिवसांपर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चार हजार ११ इतकी होती. शनिवारी (ता. पाच) प्राप्त झालेल्या अहवालात ३७० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे (ता.१५) आॅगस्ट ते (ता.पाच) सप्टेंबर या २१ दिवसाच्या कालावधीत जिल्ह्यातील बाधीत रुग्णांची संख्या आठ हजार २१२ इतकी दुपप्ट झाली आहे. दिवसभरात २४२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले तर जिल्हा रग्णालयातील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

शुक्रवारी (ता. चार) घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी तसेच शनिवारी (ता.पाच) एक हजार ६२५ अहवालापैकी १ हजार २२३ निगेटिव्ह तर ३७० स्वॅबचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर दहा दिवसांच्या औषधोपचारानंतर २४२ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. 


हेही वाचा- नांदेड- राज्यातील एसटी चालक-वाहक महिला न्यायाच्या प्रतिक्षेत ​

जिल्ह्यात एकूण बाधित आठ हजार ५८२ 

शुक्रवारी ‘आरटीपीसीआर’नुसार ७९ व अँन्टीजेन टेस्ट किटद्वारे करण्यात आलेल्या तपासणीत २९१ असे ३७० जणांचे अहवाल बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्ण संख्या आठ हजार ५८२ इतकी झाली आहे. शनिवारी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या प्रकाशनगर येथील पुरुष (वय ६८) या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत २५८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा- Video- शिक्षक दिन विशेष : निवृत्त शिक्षकाचा असाही छंद ​

बुधवारी या भागात आढळून आले रुग्ण 

नांदेड शहर -१५२, नांदेड ग्रामीण -१९, बिलोली - आठ, भोकर - चार, लोहा - पाच, नायगाव - २५, कंधार - ११, माहूर - चार, अर्धापूर - नऊ, मुखेड - ३६, किनवट - चार, देगलूर - २३, धर्माबाद - १०, उमरी - ३०, हदगाव - आठ, मुदखेड - नऊ, हिमायतनगर- एक, हिंगोली - तीन, लातूर - एक, यवतमाळ - पाच, अहमदनगर- एक, आणि बासर - एक असे ३७० जण बाधित झाले आहेत. बाधित रुग्णांपैकी २९२ रुग्णांची प्रकृती गंभीर असून सध्या दोन हजार ८२७ बाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत. रात्री उशिरापर्यंत ५१८ स्वॅबची तपासणी सुरू होती. त्याचा रविवारी संध्याकाळपर्यंत अहवाल येणार आहे. 

नांदेड कोरोना मीटर 

एकूण बाधित रुग्ण - आठ हजार ५८२ 
शनिवारी पॉझिटिव्ह - ३७० 
शनिवारी कोरोनामुक्त - २४२ 
शनिवारी मृत्यू - एक 
एकूण कोरोनामुक्त - पाच हजार ४४५ 
एकूण मृत्यू - २५८ 
उपचार सुरू - दोन हजार ८२७ 
प्रकृती गंभीर- २९२