Nanded Rain News : नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पांत ७८ दलघमीने वाढ

मध्यम, लघु प्रकल्पांत पाणीसाठा वाढला; विष्णुपुरी, मानारमध्येही समाधानकारक वाढ
nanded
nanded sakal

नांदेड : जिल्ह्यात जून महिन्यात फारसा पाऊस झाला नाही तर जुलै महिन्यात अतिवृष्टीसह मुसळधार पाऊस झाला. या दमदार पावसामुळे नांदेड मंडळातील प्रकल्पात पाणीसाठा ७८ दशलक्ष घनमीटरनुसार २४ टक्क्यांने वाढला आहे, अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. मध्यम, लघु प्रकल्पात पाणीसाठा वाढला आहे त्याचबरोबर जिल्ह्यातील विष्णुपुरी आणि मानार या दोन मोठ्या प्रकल्पांमध्येही समाधानकारक वाढ झाली आहे.

जिल्ह्यात यंदा जून महिना संपत आला तरी समाधानकारक पावसाअभावी धरणसाठ्यात कमालीची घट झाली होती. ८० प्रकल्प असलेल्या लघू प्रकल्पात तसेच नऊ प्रकल्प असलेल्या मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा तळाला गेला होता. ता. ३० जून रोजी नांदेड पाटबंधारे मंडळातील सिद्धेश्‍वर प्रकल्प कोरडा पडला होता.

नांदेड जिल्ह्यातील एकूण १०४ प्रकल्पात २०३.३९ दशलक्ष घनमीटरनुसार २७.९३ टक्केच पाणीसाठा शिल्लक होता. यानंतर मात्र जिल्ह्यात जुलै महिन्यात पावसाचे दमदार आगमन झाले. जुले महिन्यात तब्बल दीडपट अधिक पाऊस झाल्याने वार्षिक सरासरी ६२ टक्क्यांपर्यंत पोचली. प्रकल्पातील २०३.३९ दशलक्ष घनमीटरनुसार २८ टक्के असलेला पाणीसाठा सध्या ७८ दशलक्ष घनमीटरनुसार २४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

सध्या जिल्ह्यात मोठा प्रकल्प असलेल्या विष्णुपुरी प्रकल्पात ६२.५७ दलघमीनुसार ७७ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या मानार (बारुळ) प्रकल्पात ६७.३७ दलघमीनुसार ४८.७४ टक्के पाणीसाठा झाला आहे.

यासोबतच जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पात ६९.५५ दलघमीनुसार ५०.०१ टक्के पाणीसाठा झाला आहे. चार कोल्हापुरी बंधार्‌यात शुन्य टक्के पाणीसाठा आहे. ८० लघू प्रकल्पात १५६.७८ दलघमीनुसार ९०.७३ टक्के पाणीसाठा आहे.

नऊ उच्च पातळी बंधार्‍यात २६.७० दलघमीनुसार १४ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात १०४ प्रकल्पात ६०५.०३ दशलक्ष घनमीटरनुसार ६२.७६ टक्के पाणीसाठा झाला आहे. नांदेड जिल्ह्याशेजारी परभणी जिल्ह्यातील येलदरीत ४८५.२१ दलघमीनुसार ५९.९२ टक्के पाणीसाठा झाला आहे.

तर सिद्धेश्‍वर प्रकल्पात ३३.८१ दलघमीनुसार ४१.७२ टक्के पाणीसाठा झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उर्ध्व पेनगंगा (इसापूर) या प्रकल्पात ६०५.०३ दलघमीनुसार ६२.७६ टक्के पाणीसाठा झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

प्रकल्पनिहाय पाणीसाठा

प्रकल्प- दलघमी -टक्केवारी

  • विष्णुपुरी -५९.९० - ७४.१४

  • मानार -६७.३७ - ४८.७४

  • मध्यम प्रकल्प (९) - २६.७० -१४.०१

  • लघु प्रकल्प (८०) - १५६.७८ - ९०.७३

  • उच्च पातळी बंधारे (९)- २६.७० -१४.०७

  • एकूण प्रकल्प -१०४- ३८०.२९ -५२.२३

जिल्ह्याशेजारील प्रकल्पातील पाणीसाठा

  • येलदरी -४८५.२१- ५९.९२

  • सिद्धेश्‍वर -३३.८१ -४१.७२

  • इसापूर -६०५.०३ -६२.७६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com