esakal | नांदेड - कोरोनामुळे मृत्यूचे सत्र थांबता थांबेना , गुरुवारी २३६ जण पॉझिटिव्ह, सात बाधितांचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

गुरुवारी (ता. २४) एक हजार १४२ जणांचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये ८७५ निगेटिव्ह, २३६ जण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४ हजार ४३६ वर पोहचली आहे.

नांदेड - कोरोनामुळे मृत्यूचे सत्र थांबता थांबेना , गुरुवारी २३६ जण पॉझिटिव्ह, सात बाधितांचा मृत्यू 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूचा दर हा इतर जिल्ह्याच्या तुलनेत सरासरीपेक्षा अधिक आहे. गुरुवारी (ता. २४) प्राप्त झालेल्या अहवालात सात कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. २३६ नव्याने पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. दरम्यान, दहा दिवसाच्या उपचारानंतर २६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. 

बुधवारी (ता.२३) घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी गुरुवारी (ता. २४) एक हजार १४२ जणांचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये ८७५ निगेटिव्ह, २३६ जण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४ हजार ४३६ वर पोहचली आहे. मागील २४ तासात सात जणांचा मृत्यू झाला आहे. विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयातील कौडगाव (ता. लोहा) पुरुष (वय ७५), एकतानगर नांदेड पुरुष (वय ७०), मुक्रमाबाद (ता. मुखेड) पुरुष (वय २४) असे तीन तसेच जिल्हा रुग्णालय धर्माबाद पुरुष (वय ६१), बसवेश्‍वर नगर नांदेड पुरुष (वय ५२) असे दोन तर मानसनगर नांदेड महिला (वय ७०) खासगी रुग्णालयात व धानोरा (ता. किनवट) महिला (वय ६०) किनवट कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३७८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा- मुक्रमाबाद धान्य घोटाळा : जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष ​

गुरुवारपर्यंत दहा हजार ४५० रुग्ण कोरोनामुक्त 

श्री गुरु गोविंदसिंघ स्मारक जिल्हा रुग्णालयीतील १७, विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात १२, एनआरआय भवन, पंजाब भवन, महसूल भवन व घरी क्वॉरंटाईनमधील १५९, बिलोलीत दोन, धर्माबादला सहा, मुखेडला १९, माहूरचे १३, उमरीचा एक, किनवटचे सात, लोह्यातील सात, नायगावचे १५, हदगावचे ११ आणि खासगी रुग्णालयातील पाच अशा २६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारपर्यंत दहा हजार ४५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

हेही वाचले पाहिजे- नांदेडला खासदारांच्या घरासमोर शेतकरी संघटनेचे राखरांगोळी आंदोलन ​

५३ रुग्णांची प्रकृती गंभीर 

गुरुवारी नांदेड वाघाळा महापालीका हद्दीत १३२, नांदेड ग्रामीणमध्ये आठ, कंधारला चार, अर्धापूरला सहा, भोकरला पाच, देगलूरला पाच, हदगावला दोन, धर्माबादला ११, किनवटला चार, बिलोलीत दोन, हिमायतनगरला तीन, मुखेडला २२, नायगावला आठ, लोह्यात सात, मुदखेडला दहा, उमरीत दोन, माहूरला एक, परभणीत दोन, बीडला एक, हिंगोलीत एक असे २३६ जण पॉझिटिव्ह आढळुन आले. सध्या जिल्ह्यात तीन हजार ५३७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून त्यापैकी ५३ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. 
 
नांदेड कोरोना मीटर 

एकुण कोरोना पॉझिटिव्ह - १४ हजार ४३६ 
आज गुरूवारी पॉझिटिव्ह रुग्ण - २३६ 
आतापर्यंत कोरोनामुक्त - १० हजार ४५० 
आज गुरूवारी कोरोनामुक्त - २६७ 
एकुण मृत्यू - ३७८ 
आज गुरूवारी मृत्यू - सात 
सध्या उपचार सुरु - तीन हजार ५३७ 
अतिगंभीर रुग्ण - ५३ 
स्वॅबची प्रतिक्षा - एक हजार ४९४ 
 

loading image