esakal | नांदेड : आठवडाभरानंतर कोरोनाबाधितासह रुग्णांच्या मृत्यूसंख्येत घट 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

मागील काही दिवसापासून जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या दिडशे ते दोनशे अशी वाढत होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झाली होती. शनिवारी मात्र ही संख्या ११४ वर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधीत रुग्णांची संख्या तीन हजार १५६ इतकी झाली आहे

नांदेड : आठवडाभरानंतर कोरोनाबाधितासह रुग्णांच्या मृत्यूसंख्येत घट 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : आठवडाभरानंतर नांदेड जिल्ह्यातील वाढणाऱ्या मृत्यूचा आकडा आणि कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. शनिवारी (ता. आठ) ४५६ अहवाल प्राप्त झाले होते. त्यात २९३ निगेटिव्ह आणि ११४ स्वॅब पॉझिटिव्ह आढळून आले. तर दोन रुग्णांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर ९२ रुग्ण कोरोना मुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. 

मागील काही दिवसापासून जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांची

संख्या दिडशे ते दोनशे अशी वाढत होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झाली होती. शनिवारी मात्र ही संख्या ११४ वर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधीत रुग्णांची संख्या तीन हजार १५६ इतकी झाली आहे. ९२ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून आत्तापर्यंत एक हजार ४१५ रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत. शुक्रवारी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या नांदेडच्या सिडकोतील महिला (वय ७२) व कासारखेडा (ता. अर्धापूर) येथील पुरुष (वय ७२) अशा दोन बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील मृत्यू संख्या ११६ इतकी झाली आहे. 

हेही वाचा- नांदेड : सलग दोन वेळा एकच दुकान फोडणारा चोरटा कोठडीत ​

११४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

आरोग्य विभागाच्या वतीने कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व कोरोनाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना शोधून त्यांची आरटीपीसीआर व अँन्टीजेन असा दोन्ही पद्धतीने स्वॅब तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे प्रयोगशाळेकडून तपासलेल्या स्वॅबचा अहवाल अगदी काही तासात प्राप्त होत आहे. शनिवारी आरटीपीसीआरद्वारे ९२ व अँन्टीजेन तपासणीतून २२ असे एकुण ११४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

हेही वाचा- Video- नांदेड :महसूल भवन कर्मचारी निवासस्थानातील बाधीतांकडे दुर्लक्ष

तालुकानिहाय सोमवारी सापडलेले रुग्ण 

अ-क्र जिल्ह्यातील रुग्ण शहर व तालुका निहाय  संख्या
1 नांदेड महापालिका - ३०
2 नांदेड ग्रामीण - दोन 
3 अर्धापूर - सहा 
4 बिलोली- चार 
5 भोकर- चार 
6 कंधार- तीन 
7 नायगाव- पाच 
8 लोहा- एक 
9 हिंगोली- एक 
10 यवतमाळ - एक 
11 धर्माबाद - एक 
12 देगलूर- १७ 
13 हदगाव- आठ 
14 किनवट - तीन 
15 मुखेड- २२ 
16 उमरी- एक 
17 परभणी - तीन 
18 लातूर- एक 
19

माहूर-

तीन

                      एकुण - ११४ 

नांदेड कोरोना मीटर 

एकूण सर्व्हेक्षण - एक लाख ४९ हजार ८६१ 
एकूण घेतलेले स्वॅब - २० हजार ७५४ 
एकूण निगेटिव्ह - १५ हजार ८४७ 
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - तीन हजार १५६ 
आज शनिवारी पॉझिटिव्ह रुग्ण - ११४ 
एकूण मृत्यू संख्या - ११६ 
आज शनिवारी मृत्यू संख्या - दोन 
एकूण रुग्णालयातून सुटी झालेले रुग्ण - एक हजार ४१५ 
आज शनिवारी सुटी झालेले रुग्ण - ९२ 
सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण - एक हजार ६०८ 
सध्या गंभीर प्रकृती असलेले रुग्ण - ८५ 
प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या ३२६