नांदेड : देगाव, लोणी खुर्द, उमरीत धक्कादायक निकाल, धामदरीत भास्करराव पेरे पाटील पॅनल विजयी

लक्ष्मीकांत मुळे
Monday, 18 January 2021

तालुक्यातील धामदरी ग्रामपंचायत निवडणूकीत दत्ता पाटील कदम यांनी आदर्श गाव पाटोदाचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या नावाने पॅनल केले होते.

अर्धापुर ( जिल्हा नांदेड ) : तालुक्यातील धामदरी ग्रामपंचायत निवडणुकीत आदर्श गाव पाटोदाचे सरपंच यांच्या नावाने तयार केलेल्या पॅनलला सात जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे भास्करराव पेरे पाटील यांच्या पॅनलचा पाटोद्यात पराभव झाला आहे. तर देगावात भगवान तिडके, चाभ-यात आनंद भंढारे, लोणी खुर्दमध्ये संजय लोणे यांच्या पॅनलला बहुमत मिळाले आहे.

तालुक्यातील धामदरी ग्रामपंचायत निवडणूकीत दत्ता पाटील कदम यांनी आदर्श गाव पाटोदाचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या नावाने पॅनल केले होते. या पॅनलला सातपैकी सात जागा मिळाल्या आहेत. लोणी खुर्द येथे माजी सरपंच संजय लोणे यांच्या गटाचे नऊ उमेदवार निवडूण आले आहेत. तर भाऊरावचे अध्यक्ष गणपतराव तिडके यांचे चिरंजीव भगवान तिडके यांच्या पॅनलला आठ जागा मिळाल्या आहेत. चाभरा ग्रामपंचायती मध्ये आनंद भंडारे यांच्या पॅनलला बहुमत मिळाले आहे. शेलगावमध्ये ज्ञानेश्वर राजेगोरे, बेलसरमध्ये रमेश क्षिरसागर, जांभरुणमध्ये मारोतराव गव्हाणे, सांगवीत कामजी कल्याणकर,शेणीत संतोष धुमाळ यांच्या पॅनलला नऊ जागा मिळाल्या आहेत.

हेही वाचाGram Panchayat Result : अर्धापुरात धक्कादायक निकालांची परंपरा कायम, प्रस्थापीतांनी आपले गड राखले

तालुक्यातील ग्रामपंचायतीचे निकाल धक्कादायक लागले आहे. तसेच काही मतांचा फरकाने गावविकासाची संधी हुकली आहे. शाहपूरमध्ये ईश्वरी चिठ्ठीने कालीका भगवान पवार विजयी झाल्या आहेत. तर पिंपळगाव, येळेगाव, मेंढला खुर्द येथील उमेदवार एक ते पाच मतांच्या फरकाने विजय झाले आहेत.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Degaon, Loni Khurd, Umrit shocking result, Bhaskarrao Pere Patil panel wins in Dhamdari nanded news