नांदेड : देशव्यापी हाकेनुसार सीटूचे जिल्हा कचेरीसमोर निदर्शने

file photo
file photo

नांदेड - कामगार- शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन देशव्यापी आंदोलन करण्याची हाक संयुक्त कृती समितीच्या वतीने देण्यात आली होती. त्या प्रमाणे नांदेड जिल्हा कचेरी समोर सीटू कामगार संघटनेच्या  वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली.

कामगारांच्या ज्वलंत मागण्या घेऊन जोशपुर्ण घोषणाबाजी करण्यात आली.त्या मागण्या मध्ये शासनाच्या निर्देशा नुसार नांदेड मानपा क्षेत्रामध्ये आशा व गट प्रवर्तकांची भरती तातडीने करण्यात यावी.सर्व आशा व गट प्रवर्तकांना जिल्हा परिषद फंडातून कोरोना सर्वेचा मोबदला देण्यात यावा.दिवाळी बोनस किमान पाच हजार रूपये देण्यात यावे.मानपाने तीन हजार रूपये प्रोत्साहन भत्ता लागू केला तो केवळ एक महिन्याचा देण्यात आला उर्वरीत प्रोत्साहन भत्ता दरमहा प्रमाणे देण्यात यावा.गणवेशाचे मंजूर झालेले बाराशे रूपये देण्यात यावेत.

नांदेड शहरातील ख्रिश्चन दफनभूमिचा प्रश्न निकाली काढण्यात यावा

गट प्रवर्तक ताईंना चोविस हजार आणि आशा ताईंना एकवीस हजार रूपये लागू करून सेवेत कायम करावे. नांदेड शहरातील ख्रिश्चन दफनभूमिचा प्रश्न निकाली काढण्यात यावा.मनपा हद्दीतील सर्वे नंबर ५६ बी येथील गुल्हाने दांपत्यांना मंजूर झालेला मोबदला तात्काळ देण्यात यावा. मयत आनंद मारोती केंद्रे व इतर दोन शाळकरी मुलांचे गोदावरी नदी पात्रात सन २०१८ मध्ये अवैध वाळू उपसा व ऊत्खनन झाल्याने मृत्यू झाला आहे.त्या संबंधिता विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. मानपा क्षेत्रात काम करणाऱ्या आशा वर्कर श्रीमती द्रोपदा पाटील यांना अपघात भरपाई पोटी एक लाख रूपयांची आर्थिक मदत करण्यात यावी.शहरातील वैद्यकीय अधिकारी आशांना मानसिक व शाब्दिक छळ करण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

यांची होती उपस्थिती

त्रास देऊ नये अशा सुचना सर्व वैद्यकिय अधिकाऱ्यांना देण्यात याव्यात. कोरोना रोगाच्या आडून डॉक्टर व दवाखान्या मार्फत बेसूमार लूट केली जात आहे.त्या दवाखान्यावर व डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात यावी.आदी मागण्या लेखी स्वरूपात देऊन घोषणा देण्यात आल्या.आंदोलनाचे नेतृत्व कॉ. विजय गाभणे, कॉ. उज्वला पडलवार, कॉ.गंगाधर गायकवाड,कॉ.मारोती केंद्रे, कॉ. रविन्द्र जाधव,कॉ. रेखा धूतडे,सॕम्यूअल नागूरे, कॉ. दत्तोपंत इंगळे, कॉ.संतोष साठे, कॉ.जयराज गायकवाड, कॉ. सं. ना. राठोड, जेकब वेलूरकर, जेम्स स्वामी, स्वामीदास बेदरे, कॉ.शरयू कुलकर्णी, कॉ. द्रोपदा पाटील आदींनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com