esakal | नांदेड : धनव्याचीवाडी आदिवाशी पाड्याची विकास कामे मार्गी, सकाळचा होता पाठपुरावा 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

हिमायतनगर तालुक्यात तेलंगणाच्या सिमेला लागून अनेक आदिवासी पाडे व बंजारा तांडे असून ही मुलभूत सुविधा व विकासापासून कोसो दूर आहेत. या संदर्भात दै. सकाळने या डोंगरी परिसरातील वाड्या तांड्याचा विकास व्हावा म्हणून अनेक वेळा वृत्त प्रकाशित केले होते.

नांदेड : धनव्याचीवाडी आदिवाशी पाड्याची विकास कामे मार्गी, सकाळचा होता पाठपुरावा 

sakal_logo
By
प्रकाश जैन

हिमायतनगर (जिल्हा नांदेड) : अतिदुर्गम असलेल्या धनव्याचीवाडी या आदिवासी पाडा विकासापासून कोसो दुर होता, या पाड्याची विकास कामे होवून येथील आदिवासी बांधव मुख्य प्रवाहात येण्यासाठी सकाळने सलग चार दिवस मालीका लावून प्रशासनाला व लोकप्रतिनिधी ला जागे केले होते. अखेर विकासाची कामे मार्गी लागल्याने आदिवासी बांधवातून समाधान व्यक्त केले जात आहे. 

हिमायतनगर तालुक्यात तेलंगणाच्या सिमेला लागून अनेक आदिवासी पाडे व बंजारा तांडे असून ही मुलभूत सुविधा व विकासापासून कोसो दूर आहेत. या संदर्भात दै. सकाळने या डोंगरी परिसरातील वाड्या तांड्याचा विकास व्हावा म्हणून अनेक वेळा वृत्त प्रकाशित केले होते. ह्यातीलच डोंगराच्या कुशीत दडलेला धनवेवाडी ह्या गावातील शाळेची इमारत नसल्याने मुलांना मारोती मंदिराच्या पाराच्या ओट्यावर ज्ञानाचे धडे दिल्या जात होते. या संदर्भात दै. सकाळने मालिका लावून वृत्त प्रकाशित करताच जिल्हा परिषद प्रशासनाला जाग येऊन येथील शाळेचे काम मार्गी वर्ग खोल्यांचे बांधकाम करण्यात आल्या असल्याने येथील नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचामुदखेड सिआरपीएफ केंद्रात पोलिस स्मृती दिवस साजरा -

अंगणवाडी इमारतीचे काम हाती घेऊन आदिवासी बालकांची फरफट थांबवावी

सदर गावाला जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिकांना पायपीट करून ये जा करावी लागत असे, आता मात्र कच्चा का होईना?  रस्त्याचे काम मार्गी लागले असून त्वरित प्रशासनाने दखल घेऊन पक्का रस्ता मजबूतीकरण मार्गी लावावा. अशी मागणी आदिवासी बांधवातून केली जात आहे. सकाळ वृताची दखल घेऊन तत्कालीन उपविभागीय अधिकारी महेश वडदकर यांनी या आदिवासी पाड्याला वेळो वेळी पायपीट करून विकास कामे कशी लागतील या संदर्भात पुरेपूर प्रयत्न केले होते. आज घडीला सदर ठिकाणी अंगणवाडी इमारत नसल्याने पाड्यात कुठेतरी उघड्या जागेवर चिमूकल्याची अंगणवाडी भरवल्या जात असल्याने आदिवासी समाजाच्या बालकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. तरी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाने त्वरित दखल घेऊन अंगणवाडी इमारतीचे काम हाती घेऊन आदिवासी बालकांची फरफट थांबवावी. अशी मागणी ही पुढे येत आहे.

महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देवून अर्थिक दृष्टया प्रबळ करण्याची गरज

प्रशासन एकीकडे आदिवासी समाजाचा विकास होवून विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे म्हणून आटोकाट प्रयत्न करीत असताना माञ  शासकीय अधिकाऱ्याच्या वेळकाढू धोरणामुळे आदिवासी परिसरातील विकास कामे मार्गी लागत नसल्याने आज ही आदिवासी बांधवांना हलाखीचे जिवन जगावे लागत आहे. शासनाने आदिवासी महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देवून अर्थिक दृष्टया प्रबळ करण्याची गरज आहे. आजही आदिवासी परिसरात अनेक समस्या असून जिल्हा प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष वेधून हिमायतनगर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या पाड्या, तांडे, वाड्याचे विकात्मक कामे हाती घेतल्याशिवाय या दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या सुटणार नाहीत. आजही आदिवासी नागरिकांना मोह फुले, तेंदू पत्ते, डिंक गोळा करून आपल्या कुटुंबाचा गाढा चालवावा लागत असल्याचे चित्र तालुक्यातील आदिवासी भागात दिसत आहे. 

येथे क्लिक कराकोरोना इफेक्ट- नांदेड एसटी विभागास दोन कोटी ९४ लाखाचा तोटा; लांब पल्ल्‍याच्या बस लवकरच सुरू होणार -

आज फलनिष्पत्ती दिसत आहे

सकाळने प्रत्यक्ष आमच्या आदिवासी पाड्याला भेट देवून येथील समस्या जाणून घेवून सलग सकाळमध्ये पाड्यातील विविध समस्यांवर सलग चार दिवस वृत्त प्रकाशित करुण प्रशासनाला जाग आणून दिल्याने त्याचीच आज फलनिष्पत्ती दिसत असून शाळा आणि रस्त्याची कामे मार्गी लागली असल्याने सकाळचे या भागातील नागरिकांनी शतशः आभार मानले आहेत. 

-संजय माझळकर, धनव्याचीवाडी, ता. हिमायतनगर, नांदेड.

संपादन - प्रल्हाद कांबळे