Omicron update | नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढताच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona update
नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढताच

Corona Update | नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढताच

नांदेड : जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या एक हजार ६५८ अहवालापैकी शुक्रवारी (ता.१४) ५५३ अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या ९२ हजार ७४२ एवढी झाली असून यातील ८८ हजार २२६ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला एक हजार ८६१ रुग्ण उपचार घेत असून तीन बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. (corona and Omicron update)

हेही वाचा: अर्थसंकल्पीय अधिवेशनावर संकटाचे ढग, 700 हून अधिक जणांना कोरोना

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६५५ एवढी आहे. बाधितांमध्ये नांदेड महापालीका क्षेत्रात ३१२, नांदेड ग्रामीण ३५, अर्धापूर सात, भोकर सात, देगलूर चार, धर्माबाद दहा, हदगाव पाच, हिमायतनगर एक, कंधार ५२, किनवट ३५, लोहा १३, माहूर चार, मुदखेड तीन, मुखेड २५, नायगाव दहा, उमरी दोन, बिलोली सात, अमरावती सात, औरंगाबाद एक, पुणे तीन, हिंगोली नऊ, परभणी २०, नागपूर एक, वर्धा एक, वाशिम तीन, यवतमाळ एक, कोल्हापूर एक, निजामाबाद दोन व पंजाब दोन असे ५५३ कोरोना बाधित आढळले आहे.

हेही वाचा: पुण्यात नवे निर्बंध? रुग्ण वाढल्यानंतर अजित पवारांची तातडीची बैठक

आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नऊ, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण १०६, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड दहा, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण दोन व खासगी रुग्णालय एक कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली. सध्या एक हजार ८६१ कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी १७, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल पाच, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ३८९, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण एक हजार ४३२, खासगी रुग्णालय १८ अशा एकुण एक हजार ८६१ व्यक्ती उपचार घेत आहेत.

Web Title: Nanded District As The Number Of Corona Increases

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top