नांदेड : केळी पीक विमाप्रकरणी जिल्हा समितीकडून पाहणी, धक्कादायक त्रुट्या उघडकीस

लक्ष्मीकांत मुळे
Sunday, 11 October 2020

सर्व यंत्रणांची मिलीभगत आसल्यामुळे शेतकरी विम्याच्या लाभा पासून वंचित राहिला आहे. पिक विमा योजना म्हणजे अंधळ दळतंय,कुत्र पिठ खातंय आशी परिस्थिती दरवर्षी पिक विम्याच्या बाबतीत होत आहे

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : गेल्यावर्षी केळीचा विम्याची रक्कम अर्धापूर, दाभड, बारड मंडळातील शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नेमलेल्या जिल्हा समीतीकडून शनिवारी (ता. दहा)  पाहणी करुन पंचनामा करण्यात आला. यात आनेक धक्कादायक त्रुट्या निदर्शनास आल्याने विमा कंपनीची हातचालाखी उघडकीस आली आहे. सर्व यंत्रणांची मिलीभगत आसल्यामुळे शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहिला आहे. पिक विमा योजना म्हणजे अंधळ दळतंय, कुत्र पिठ खातंय अशी परिस्थिती दरवर्षी पिक विम्याच्या बाबतीत होत आहे. अशा संतप्त प्रतिक्रिया शेतक-यांतून व्यक्त केल्या जात आहेत.

फळपिकांसाठी हवामानावर अधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येते. यासाठी शेतक-यांकडून कही टक्के रक्कम भरून घेऊन उर्वरीत विमा संरक्षण रक्कम शासन भरते. ही फळ पिक योजना शेतक-यांच्या कमी फायद्याची तर विमा कंपनीच्या जादा फायद्याची आहे हे अनेक वेळा सिध्द झाले आहे.

हेही वाचा - सहस्त्रकुंड धबधबा मृत्यूचा हॉटस्पॉट : यवतमाळची पर्यटक महिला गेली वाहून

पालकमंत्री अशोक चव्हाण यांना प्रत्यक्ष भेटून पीकविमा मिळावा ही मागणी

नांदेड जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पण जिल्हात सर्वाधिक केळीचे उपन्न असलेल्या अर्धापूर, दाभड, बारड या मंडळातील शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही. त्यामुळे काँग्रेस कमेटीसह अनेक गावातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांना प्रत्यक्ष भेटून पीकविमा मिळावा ही मागणी होती.

तिन मंडळात पाहणी करण्यासाठी जिल्हा समीती नियुक्ती

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सबंधीत अधीकाऱ्यांसह शेतकऱ्यांची बैठक घेऊन वरील तिन मंडळात पाहणी करण्यासाठी जिल्हा समीती नियुक्ती केली.या समीतीचे जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बाळासाहेब रावणगावकर, जिल्हा कषी अधीक्षक रवीशंकर चलवदे, हवामान तज्ञ डॉ. के. के. डाखोरे, संजय मोरे यांचा समावेश होता. यावेळी अर्धापूर, मालेगाव, येळेगाव - दाभड या तिन्ही ठिकाणी स्वयंचलीत हवामान केंद्राची पाहणी करुन या केंद्राच्या लगत झाडे, साठवलेले पाणी, चूकीच्या पध्दतीने यंत्र बसविणे, जिथे जास्त केळीची लावगड तिथे विमा मिळू दिला नाही. यासह अनेक त्रुटीचा उल्लेख करुन शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यासह तिन वेगवेगळे पंचनामे  करण्यात आले.

यांची होती उपस्थिती 

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे, पं. स. सभापती कांताबाई अशोक सावंत, केशवराव इंगोले, जि. प. सदस्य बबन बारसे, सुनील अटकोरे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनमंत राजेगोरे, संतोष गव्हाणे, अशोक सावंत, निळकंठ मदने, रंगनाथ पाटील इंगोले, ईश्र्वर इंगोले, नागोराव भांगे, पवन इंगोले, कामाजी अटकोरे, अवधूत कदम यांची उपस्थिती होती.

येथे क्लिक करा नायगाव बाजार समितीचा निर्णय : शेतकऱ्यांची आर्थिक लुट थांबणार

कंपनीची हातचालाखी

हावामान अधारित फळपिक विमा केळीसाठी लागू आसल्यामुळे अर्धापूर तालुक्यात जास्त संख्येने विमा काढण्यात आला होता. पण या भागातील शेतक-यांना विम्याचा लाभ मिळूच नये आशी व्यवस्था विमा कंपनीने केली होती की काय आसा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिथे हावामान मापक यंत्र बसविण्यात आले आहे. त्यां परिसरात झाडे, इमारत ,पाणी, सतत सावली नसावी. तसेच यंत्राची दिशा योग्य असावी आदी मार्गदर्शक सुचनांचे तिन्ही मंडळात पालन करण्यात आले नसल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समितीच्या निदर्शनास आली आहे. समितीच्या आहवालवरून त्वरित विमा भरपाई रक्कम देण्यात यावी आशी मागणी शेतक-यातून होत आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: District Committee inspects banana crop insurance case, reveals shocking errors nanded news