नांदेड जिल्ह्यात आत्तापर्यंत ९९.४४ टक्के पावसाची नोंद

नांदेड -  डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडून गोदावरी नदीत विसर्ग सुरू आहे.
नांदेड -  डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडून गोदावरी नदीत विसर्ग सुरू आहे.

नांदेड - जिल्ह्यात मंगळवारी (ता. २२) सायंकाळच्या सुमारास काही भागात जोरदार पाऊस झाला. हा पाऊस बिलोली, नांदेड, मुदखेड, कंधार, लोहा हदगाव, अर्धापूर, माहूर, हिमायतनगर तालुक्यात झाल्याची माहिती मिळाली. सततच्या पावसामुळे हाताशी आलेल्या सोयाबीनची मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

नांदेड जिल्ह्यात यंदाच्या वर्षी ता. एक जूनपासून ते आत्तापर्यंत ७८४.२३ मिलीमीटरनुसार ९९.४४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी (ता. २३) सकाळी आठ वाजता सरासरी १२.६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आजपर्यंत ७८४.२३ मिलीमीटरनुसार ९९.४४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून कमी अधिक प्रमाणात सर्वत्र पाऊस सुरू आहे. या पावसामुळे खरिपातील सोयाबीन, कापूस व ज्वारी या पिकांना बाधा पोहोचली आहे. 

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान
दमदार पावसामुळे जिल्ह्यातील मोठे तसेच मध्यम आणि लघुप्रकल्प तुडुंब भरले आहेत. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील काही मंडळांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतीतील सोयाबीन, ज्वारी, तूर आणि कापूस या पिकांचे नुकसान झाले. तसेच ऊस, पपई व इतर फळबागांचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी विविध पक्ष, संघटनांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. 

खरिपाला धोका मात्र रब्बीची अपेक्षा
सलग पडणाऱ्या पावसामुळे उभ्या कपाशीच्या बोंडाना मोड फुटत आहेत. या सोबतच सोयाबीनच्या शेंगानाही पावसामुळे मोडे येत आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे खरिप पिकांना बाधा पोचली तर रब्बीत फायदा होईल, अशी आशा आता शेतकऱ्यांना आहे. शनिवार, रविवारनंतर सोमवारी काहीसा मंदावलेला पाऊस मंगळवारी जोरदार झाला. बुधवारी (ता. २३) सकाळी आठ वाजता सरासरी १२.६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आजपर्यंत ७८४.२३ मिलीमीटरनुसार ९९.४४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. 
 
हेही वाचलेच पाहिजे - परभणीत जुन्या जलवाहिण्यांवरील पाणी वितरण होणार बंद
 
विष्णुपुरीतून विसर्ग सुरुच 

सर्वत्र पाऊस सुरु असल्यामुळे गोदावरी नदीमध्ये पाण्याचा येवा वाढला आहे. तसेच जायकवाडी, येलदरी व सिध्देश्वर प्रकल्पाचे पाणीही विष्णुपुरीत येत असल्याने मागील आठ दिवसापासुन दरवाजे उघडून पाणी सोडण्यात येत आहे. बुधवारी (ता. २३) येवा कमी झाल्याने विष्णुपुरी प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडून त्यातून ९२ हजार ५०० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती नांदेड पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com