esakal | Nanded : सध्या ६१ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु, आठ जण पाॅझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

Nanded : सध्या ६१ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु, आठ जण पाॅझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात गुरूवारी (ता.आठ) प्राप्त झालेल्या एक हजार ८६६ अहवालापैकी आठ अहवाल कोरोनाबाधित Corona आले आहेत. आजच्या घडीला ६१ रुग्ण उपचार घेत असून एका बाधिताची प्रकृती अतिगंभीर आहे. गुरुवारी जिल्ह्यातील Nanded ११ कोरोनाबाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ९१ हजार ३०५ एवढी झाली असून यातील ८८ हजार ७४१ रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या एक हजार ९०६ एवढी आहे. गुरुवारी बाधितांमध्ये आरटीपीसीआरमध्ये RTPCR Test नांदेड ग्रामीण - एक, कंधार - एक, धर्माबाद - एक तर ॲन्टीजेन तपासणीद्वारे नांदेड महापालिका हद्दीत दोन, मुखेड -एक, लोहा - एक, किनवट - एक असे एकूण आठ बाधित आढळले.nanded district reported covid 8 cases today

हेही वाचा: Aurangabad: पिकांमध्ये निलगायींचे धुडगूस, शेतकऱ्यांमध्ये दहशत

नांदेड कोरोना मीटर

एकुण पॉझिटिव्ह - ९१ हजार ३०५

एकूण बरे - ८८ हजार ७४१

एकुण मृत्यू - एक हजार ९०६

गुरुवारी पॉझिटिव्ह- आठ

गुरुवारी बरे -११

गुरुवारी मृत्यू- शुन्य

उपचार सुरु -६१

अतिगंभीर प्रकृती - एक

loading image